Advertisement

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू

कोरोनावार मात केल्यानंतर अनेक रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास होत आहेत.

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी या व्हायरसवर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. मात्र, कोरोनावार मात केल्यानंतर अनेक रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास होत आहेत. त्यामुळं याची चाचपणी करण्यासाठी कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये आता 'पोस्ट कोव्हिड ओपीडी' सुरू करण्यात येणार आहे.

१ सप्टेंबरपासून या वैद्यकीय सुविधेला सुरुवात होणार आहे. ओपीडीमध्ये पल्मनरी फायब्रोसिस असलेल्या रुग्णांना हा शारीरिक त्रास केव्हापासून होतो, निकटच्या संपर्कातील इतर व्यक्तींना लक्षणे जाणवत आहेत का याचीही विचारणा केली जाणार आहे. सेव्हन हिल्स या रुग्णालयामधून ७ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, 'केईएम, लो. टिळक आणि नायर रुग्णालयामध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी ओपीडी सुरू करण्यात आली. फुफ्फुसामध्ये दाह होत असल्याच्या, थकवा येत असल्याच्या तक्रारी घेऊन येथे रुग्ण येतात. अशा प्रकारचा त्रास सेव्हन हिल्स रुग्णालयातून उपचार घेतलेल्या रुग्णांनाही होतो का, याबाबत रुग्णालयानं एक प्रश्नावली तयार केली आहे. त्यात १७ प्रश्न आहेत. यांतून कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सद्यस्थिती समजेल.

'आयसीएमआर'नं दिलेल्या नव्या निर्देशानुसार आता उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी पूर्ण पीपीई किटची गरज नाही. त्यांनी मास्क आणि ग्लोव्ह्ज घातले तरी, पुरेसे आहे. त्यामुळं फोनवरून विचारणा केलेल्या कोरोनामुक्त व्यक्तींमध्ये फुफ्फुसाचा दाह किंवा इतर कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास दिसत असल्यास या रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. 

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८७ दिवसांवर आला आहे. मुंबईत दररोज हजार ते १२०० रुग्ण आढळत आहेत. पण त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. मुंबईत ३१ जुलै रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ७६ दिवसांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७६ होती. हा सरासरी दर आता ८१ टक्क्यांवर आला आहे.हेही वाचा -

'पुढच्या वर्षी लवकर या..' ५ दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

फोर्ट परिसरातील इमारतीला आग, १ जण गंभीर जखमी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा