Advertisement

नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येथील सक्रिय रुग्णांची संख्याही जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे.

नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण
SHARES

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर,  बदलापूर, अंबरनाथ, मिरा भाईंदर, ठाणे ग्रामीणमधील कोरोना नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे. मात्र,  नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येथील सक्रिय रुग्णांची संख्याही जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे. 


नवी मुंबईत जिल्ह्यातील सर्वाधिक ३ हजार ४१६ आणि कल्याण-डोंबिवलीत ३ हजार १५७ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.  तर भिवंडीत १८३, उल्हासनगरमध्ये ३२७,  ठाणे शहरात १ हजार ७८८,  मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ४५१, ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ३६०, बदलापूरमध्ये २७८ आणि अंबरनाथमध्ये ३०२ सक्रिय रुग्ण आहेत.


ठाणे जिल्ह्य़ात मागील १५ दिवसात १७ हजार नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी भिवंडी शहरात २९७, उल्हासनगरमध्ये ४६२, मीरा-भाईंदरमध्ये २ हजार ८८, ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार २८३, बदलापूरमध्ये ७६९ आणि अंबरनाथमध्ये ४६५ नवे रुग्ण आढळले आहेत. 


१५ दिवसांमध्ये नवी मुंबईत तब्बल ५ हजार १४८, तर कल्याण-डोंबिवलीत ४ हजार ३६५  कोरोना रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही शहरांमध्ये रोज ३०० हून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. येथील मृत्युदरही अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील कोरोना रुग्णवाढ चिंताजनक बनली आहे.



हेही वाचा -

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्क्यांवर



 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा