कल्याण डोंबिवलीत २७२ नवे कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे नवीन २७२ रुग्ण आढळले. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.  पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णाची संख्या २७ हजार ६८४ इतकी आहे. तर आतापर्यंत ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . गेल्या २४ तासांत २१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नवीन रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्व ९१,  कल्याण पश्चिम ९० ,डोंबिवली पश्चिम ३३ , कल्याण पूर्व २९ , मांडा टिटवाळा १६, मोहणे आंबिवली  ०७ , पिसवलीतील ०६ रुग्णांचा समावेश आहे. पालिकेच्या शासकीय रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात ३३४३ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यत २३७४९ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. 

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून आणि १२ रुग्ण हे वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुल येथून आणि ८ रुग्ण बाज आर.आर.रुग्णालय, ०९ रूग्ण पाटीदार कोव्हिड केअर सेंटरमधून, ०४ रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कुलमधून, ०२ रूग्ण शास्त्रीनगर रूग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयांमधून तसेचे होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू

नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

मिरा-भाईंदरमधील वाढते मृत्यू चिंतेचा विषय


पुढील बातमी
इतर बातम्या