नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे 'इतके' आढळले रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३१४ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १३ हजार ९३२ झाली आहे.  

सोमवारी बेलापूर ४३, नेरुळ ६९, वाशी ३६, तुर्भे ३३, कोपरखैरणे ८१, घणसोली २६, ऐरोली २२, दिघामध्ये ४ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३११ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३३, नेरुळ १२१, वाशी १३, तुर्भे ८, कोपरखैरणे १९, घणसोली १८, ऐरोली ९७, दिघामध्ये २ नवे रुग्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९१४१ वर पोहोचली आहे.  नवी मुंबईत सध्या ४३९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असून पालिकेने मिशन ‘ब्रेक द चेन’ ची मोहिम सुरू केली आहे.


हेही वाचा

मुंबईत आतापर्यंत 'इतके' कोरोना रुग्ण झाले बरे

बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाडमध्ये 'इतके' आहेत कोरोना रूग्ण

दादर, माहीमकरांसाठी मोफत कोरोना तपासणी केंद्र


पुढील बातमी
इतर बातम्या