पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( २३ नोव्हेंबर) ५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघर आणि खांदा कॉलनी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ८, नवीन पनवेल २, खांदा काॅलनी १, कळंबोली ५, कामोठे १५, खारघर २२, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ३, नवीन पनवेल ३, कळंबोली २, कामोठे २, खारघर येथील १० रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४८८६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३८१८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४९५ ॲक्टीव्ह रूग्ण आहे
यंदा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण, अनुयायांना मज्जाव
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होणार अँटिजेन चाचणी
महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी 'फेस रिडर' यंत्रणा