Advertisement

महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी 'फेस रिडर' यंत्रणा

महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये तशी यंत्रणा (फेस रिडर) बसवली जाणार आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी 'फेस रिडर' यंत्रणा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सरकारी व खासगी कंपन्यांनी नवीन नियमावली तयार केली आहे. या नियमावलीत अनेक बदल आहेत. अशातच आता महापालिका कर्मचाऱ्यांना चेहरा दाखवून हजेरी नोंदवावी लागणार आहे. महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये तशी यंत्रणा (फेस रिडर) बसवली जाणार आहे. त्याकरीता कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे. महापालिकेचे कार्यालयीन कर्मचारी, कामगार यांना ही हजेरी बंधनकारक राहणार आहे.

मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला तेव्हा महापालिकेतील बायोमेट्रीक हजेरी बंद करण्यात आली. ३ महिन्यांनी ही हजेरी पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, या पद्धतीमुळं संसर्गाचा धोका अधिक असल्यानं कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. तसंच, बायोमेट्रीक हजेरीला पर्याय आणण्याची मागणी कामगार संघटनांनी केली होती. त्यामुळं कॅमेरामध्ये चेहरा पाहून संगणकावर (फेस रिडर) हजेरी नोंदवण्याचा नवा पर्याय पुढे आला आहे.

महापालिकेच्या विद्युत व यांत्रिकी विभागानं तशी तयारी केली असून नायर रुग्णालयात यापूर्वी ही हजेरीची पद्धत सुरू करण्यात आली आहे. सध्या माहिती संकलनाचं काम विभाग कार्यालयात सुरू करण्यात आलं आहे. ग्रँटरोड नानाचौक येथील महापालिकेच्या डी विभाग कार्यालयात २४ नोव्हेंबपर्यंत हे माहिती संकलनाचं काम सुरू राहणार आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा