Advertisement

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होणार अँटिजेन चाचणी

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. मागील ३ दिवसांपसून कोरोनाबाधितांचा आकडा हा १ हजारापर्यंत जात आहे.

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होणार अँटिजेन चाचणी
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. मागील ३ दिवसांपसून कोरोनाबाधितांचा आकडा हा १ हजारापर्यंत जात आहे. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं महापालिका व राज्य सरकारनं कंबर कसली आहे. वारंवार नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात असून, कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. अशातच आता वर्दळीचं ठिकाण असलेल्या नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी प्रत्येक बाजारात अँटिजेन आणि आर टी पी सी आर चाचणी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात सध्या काही प्रमाणात किरकोळ विक्रीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं हळूहळू खरेदीदारांची गर्दी वाढू लागली आहे. या वाढत्या गर्दी बरोबर येणाऱ्या दुसऱ्या कोरोना लाटेचं संकट लक्षात घेता ४ ही बाजारात कोरोना चाचणी केंद्र सुरू केलं जाणार आहे. त्यासाठीच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळते.

बाजार समितीमध्ये आता १ कोरोना चाचणी केंद्र सुरू आहे. मात्र, बाजारात वाढणारी गर्दी लक्षात घेता अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रकर्षानं जाणवत आहे. बाजार समितीमधून येणाऱ्या -जाणाऱ्या खरेदीदार, विक्रेते आणि इतर घटकांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. बाजार समितीमधून येणाऱ्या-जाणाऱ्या घटकांचा संबंध थेट शहरातील व्यक्तींची येतो. त्यामुळं कोरोनाचा धोका शहरांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. यासाठीच खबरदारी म्हणून प्रत्येक बाजारात अँटिजेन आणि आर टी पी सी आर चाचणी केंद्र सुरू केले जाणार असल्याचं समजतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा