'टीबी'मुक्तीसाठी आपी, युएसएआयडीचा करार

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

टीबीमुक्त भारताच्या लढाईत 'अमेरिकन असोसिएशन ऑफ फिझिशियन ऑफ इंडियन ओरिजीन' (आपी) आणि 'युनायटेड स्टेस्ट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलेपमेंट' (यूएसएआयडी) या दोन कंपनींनी राज्य सरकारसोबत करार केला आहे.

या कराराअंतर्गत १ लाख मनुष्यबळाचा वापर करून टीबीमुक्त भारतासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंर्तगत आतापर्यंत कधीच निदान न झालेल्या १० लाख टीबी रुग्णांना शोधण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे.

या मोहिमेमुळे टीबीसाठीची जनजागृती, निदान आणि उपचार तज्ज्ञ पातळीवर करण्यास मदत होईल असं मत 'आपी'चे अध्यक्ष डॉ. नरेश पारिख यांनी स्पष्ट केलं.

अशी राबवणार मोहीम

या करारानुसार टीबीरुग्णांना शोधण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार आहे. यामध्ये मुंबई, वाराणसी, राजकोट, इंदौर, गुजरात, भोपाल आणि चेन्नई या शहराचा समावेश असे. या मोहिमेद्वारे दररोज २० ते ४० घरांमध्ये जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येईल.टीबीच्या रुग्णांची नोंद सरकारला देण्यात येईल.

देशात १० लाख टीबी रुग्णांची अद्याप नोंद झालेली नाही. त्यासाठी लोकांचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. लोकांमध्ये आजही या आजाराबद्दल भीती आहे. त्यामुळे रुग्ण स्वत:हून उपचारांसाठी पुढे येत नाहीत.

- डॉ. नरेंद्र सैनी, माजी सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)


हेही वाचा-

टीबी रुग्णांना नकोय शिरा अन् उपमा

धक्कादायक! एकट्या मुंबईत टीबीचे ६६ टक्के रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या