Advertisement

धक्कादायक! एकट्या मुंबईत टीबीचे ६६ टक्के रुग्ण

मुंबईसह राज्यात गेल्या वर्षी २ लाख नवीन टीबीच्या रूग्णांची नोंद झाली. त्यातील १ हजार रुग्णांचा मृत्यू केवळ योग्य उपचार न मिळाल्यानं झाला आहे. या २ लाख रुग्णांपैकी ६६ टक्के रूग्ण मुंबईतील आहेत.

धक्कादायक! एकट्या मुंबईत टीबीचे ६६ टक्के रुग्ण
SHARES

जगभरात क्षयरोग अर्थात टीबीच्या रूग्णांची संख्या कमी होत असताना मुंबईसह देशभरात मात्र टीबीच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई तर वाढत जाणारं टीबीचं प्रमाण चिंताजनक आहे. कारण देशातील एकूण प्रमाणाच्या तुलनेत ६६ टक्के टीबीचे रुग्ण एकट्या मुंबईत असल्याची माहिती पुढे आली आहे.


२ लाख नवीन रुग्ण

मुंबईसह राज्यात गेल्या वर्षी २ लाख नवीन टीबीच्या रूग्णांची नोंद झाली. त्यातील १ हजार रुग्णांचा मृत्यू केवळ योग्य उपचार न मिळाल्यानं झाला आहे. या २ लाख रुग्णांपैकी ६६ टक्के रूग्ण मुंबईतील आहेत. २०१५ मध्ये मुंबईत १ लाख ३० हजार ९१० रुग्ण आढळले, तर त्यातील १ हजार ४५९ रूग्णांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये १ लाख २२ हजार ६०२ रुग्ण मुंबईत आढळले असून त्यातील १ हजार २४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २०१७ मध्ये १ लाख २३ हजार ९६३ रुग्णांपैकी ९६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ही आकडेवारी लक्षात घेता मंगळवारी विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. सोबतच मुंबईला टीबीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी उचलून धरली.


५ ठिकाणी प्रयोगशाळा मंजूर

ही गंभीर बाब लक्षात घेता मुंबईला टीबीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार मुंबई शहरात जे. जे. हाॅस्पीटल, हिंदुजा हाॅस्पीटल, जीटीबी हाॅस्पीटल, मेट्रोपाेलिस हेल्थकेअर लॅबोरेटरी आणि एसआरए लिमिटेज या ५ ठिकाणी कल्चर अॅण्ड डीएसटी प्रयोगशाळा मंजूर केल्या असून या प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डाॅ. दिपक सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिली.



जनजागृतीपर कार्यक्रम

डाॅ. सावंत यांनी मात्र ६६ टक्के नव्हे, तर १८ ते २० टक्के रुग्ण मुंबईतील असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईत २४ मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेद्वारे योग्य त्या उपाययोजना आणि जनजागृती कार्यक्रम राबवला जात असल्याचंही त्यांनी स्प्ष्ट केलं. मुंबईत १३० मान्यता प्राप्त सूक्ष्मदर्शी केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे रूग्णांना मोफत थुंकीची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमडीआर-एक्सडीआर क्षयरोग रूग्णांसाठी ५ क्लचर अॅण्ड डीएसटी प्रयोगशाळांना केंद्रानं मान्यता दिली आहे. त्यानुसार ३ प्रयोगशाळा सुरू झाल्या असून पुढील ६ महिन्यांत २ प्रयोगशाळा सुरू होतील, असं डाॅ. सावंत यांनी सांगितलं.


निधीचा पूर्ण वापर

टीबी निर्मूलनासाठी उपलब्ध होणारा निधी पूर्णपणे वापरला जात नाही. तसेच मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, जागा भरल्या जात नाहीत, यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला. डाॅ. सावंत यांनी मात्र निधीचा वापर होत असून यापुढे पूर्ण निधी वापरला जाईल, असं सांगितलं.



हेही वाचा-

उपचार अन् आहार एकत्रच! 'टीबी'च्या रुग्णांना वर्षभराचं रेशन मोफत

जानेवारीत आढळले टीबीचे २ हजार ६०३ संशयित रुग्ण

औषध विक्रेत्यांनो, टीबीची औषधं विकताय? मग रूग्णांची माहिती ठेवा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा