Advertisement

जानेवारीत आढळले टीबीचे २ हजार ६०३ संशयित रुग्ण

मुंबईच्या २४ वॉर्डमध्ये 'टीबी'विरोधातील ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यात एकूण ६ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार २ हजार ६०३ संशयित रुग्ण आढळले. त्यात ११३ रुग्णांना टीबीचा संसर्ग असल्याचं समोर आलं आहे. शिवाय, त्यापैकी ५-६ जणांना एमडीआर लेव्हलचा टीबी असल्याचीही नोंद करण्यात आली आहे.

जानेवारीत आढळले टीबीचे २ हजार ६०३ संशयित रुग्ण
SHARES

मुंबई महापालिकेने 'टीबी' (क्षयरोग) विरोधात ११ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान राबवलेल्या मोहिमेत 'टीबी'चे एकूण २ हजार ६०३ संशयित रुग्ण आढळले आहेत.

मुंबईच्या २४ वॉर्डमध्ये 'टीबी'विरोधातील ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यात एकूण ६ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार २ हजार ६०३ संशयित रुग्ण आढळले. त्यात ११३ रुग्णांना टीबीचा संसर्ग असल्याचं समोर आलं आहे. शिवाय, त्यापैकी ५-६ जणांना एमडीआर लेव्हलचा टीबी असल्याचीही नोंद करण्यात आली आहे.


तात्काळ औषोधोपचार सुरू

ज्या रुग्णांना टीबी असल्याचं आढळून आलं आहे, अशा रुग्णांवर तत्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या थुकीची तपासणी करण्यात आली आहे. त्यातूनच त्यांना 'एमडीआर' लेव्हलचा 'टीबी' आहे की नाही हे निदर्शनास आलं असल्याची माहिती क्षयरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शहा यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.



कोर्स पूर्ण करणं गरजेचं

एखाद्या व्यक्तीला 'टीबी' झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीने 'टीबी'चे उपचार घेतले पाहिजेत. प्राथमिक तत्त्वावर ६ महिने तरी 'टीबी'चा कोर्स पूर्ण केला पाहिजे. मात्र जवळपास ५ ते ८ टक्के रुग्ण 'टीबी'चा कोर्स पूर्ण करत नाही. खासगी आणि महापालिका रुग्णालयात देण्यात येणाऱ्या उपचारांमध्येही अंतर पडू देऊ नये.


जनजागृती महत्त्वाची

'टीबी' हा असा आजार आहे जो संसर्गातून पसरतो. खोकल्यातून, शिंकेतून हा विषाणू पसरतो. त्यामुळे 'टीबी'च्या रुग्णाने खोकताना, शिंकताना तोंडावर मास्क किंवा रुमाल वापरला पाहिजे. जेणेकरुन तो दुसऱ्याकडे पसरणार नाही.


टीबी'बद्दल अजूनही जनजागृती होणं गरजेचं आहे. 'टीबी'चा कोर्स हा लेव्हलप्रमाणे असतो. त्यामुळे तो कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे. मध्येच कोर्स सोडला, तर 'टीबी' पुन्हा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेवर जेवणासोबत गोळ्याही घेतल्या पाहिजेत. घरातही 'टीबी' रुग्णाची काळजी घेतली पाहिजे. रुग्णाने बोलताना, फिरताना, खोकताना तोंडाला रुमाल किंवा मास्क लावलं पाहिजे.
- डॉ. दक्षा शहा, प्रमुख, टीबी कंट्रोल युनिट, मुंबई महापालिका



हेही वाचा-

उपचार अन् आहार एकत्रच! 'टीबी'च्या रुग्णांना वर्षभराचं रेशन मोफत

महापालिका घरोघरी जाऊन घेणार टीबीच्या रुग्णांचा शोध



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा