Advertisement

औषध विक्रेत्यांनो, टीबीची औषधं विकताय? मग रूग्णांची माहिती ठेवा!

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून टीबीच्या रूग्णांचा आकडा फुगत चालल्याची माहिती क्षयरोग नियंत्रण विभागाच्या सर्वेक्षणातून वेळोवेळी स्पष्ट होत आहे. मुंबईत टीबीचे रूग्ण वाढण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे मुंबईतील दमट वातावरणात टीबीचे जंतू वेगानं पसरतात. तर दुसरं कारण म्हणजे टीबीचे कित्येक रूग्ण उपचार अर्थात औषधांचा कोर्स पूर्ण करत नसल्यानं टीबी मुळापासून बरा होत नसल्याचंही समोर आलं आहे.

औषध विक्रेत्यांनो, टीबीची औषधं विकताय? मग रूग्णांची माहिती ठेवा!
SHARES

औषध विक्रेत्यांना औषध कुणाला? कधी विकलं? यासोबतच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह रूग्णांची माहिती नोंदवणं बंधनकारक आहे. आता यापुढे जात औषध विक्रेत्यांना टीबी अर्थात क्षयरोगावरील औषध विक्रीच्या माहितीसह ज्या रूग्णाला औषधं विकली त्या रूग्णाची माहिती नोंदवणंही आता आवश्यक ठरणार आहे. अशी नोंद ठेवली नाही वा ही माहिती क्षयरोग नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यास टाळाटाळ केली, तर औषध विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)कडून कारवाई होणार आहे. यासंबंधीचं परिपत्रक गुरूवारी एफडीएचे सहआयुक्त (मुख्यालय) अमृत निखाडे यांनी जारी केलं आहे.

उपचार पूर्ण न केल्यामुळे टीबीचा वाढता प्रभाव

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून टीबीच्या रूग्णांचा आकडा फुगत चालल्याची माहिती क्षयरोग नियंत्रण विभागाच्या सर्वेक्षणातून वेळोवेळी स्पष्ट होत आहे. मुंबईत टीबीचे रूग्ण वाढण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे मुंबईतील दमट वातावरणात टीबीचे जंतू वेगानं पसरतात. तर दुसरं कारण म्हणजे टीबीचे कित्येक रूग्ण उपचार अर्थात औषधांचा कोर्स पूर्ण करत नसल्यानं टीबी मुळापासून बरा होत नसल्याचंही समोर आलं आहे.

उपचार होतात मध्येच बंद

या पार्श्वभूमीवर टीबी निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी नव्यानं धोरण आखलं जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यातून टीबीच्या रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे. त्यानुसार मुंबईतील टीबीच्या रूग्णांच्या माहिती संकलनाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पालिका आणि सरकारी रूग्णालयातील टीबीच्या रूग्णांचा आकडा आणि रूग्णांची माहिती याची नोंद असते. पण खासगी रूग्णालयातील रुग्णांची अशी कोणतीही नोंद ठेवली जात नाही आणि असे रूग्ण अर्ध्यावरच उपचार बंद करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती औषध विक्रेत्यांकडून मिळवली जाणार आहे.

औषध विक्रेते औषध विक्रीची आणि रूग्णांची माहिती ठेवतातच. त्यामुळे आम्ही एफडीएसह क्षयरोग नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना नक्कीच सहकार्य करू. पण त्याचवेळी खासगी रुग्णालयांना, खासगी डाॅक्टरांनाही अशी माहिती नोंदवणं बंधनकारक करत त्यांच्याकडूनही अशी माहिती संकलित करावी. जेणेकरून रूग्णांची योग्य ती माहिती, रुग्ण घेत असलेल्या उपचारांची योग्य ती माहिती मिळेल आणि रूग्णाला आवश्यक ती मदत करणं सोप होईल.

कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन

'औषध विक्रेत्यांनो, माहिती द्या'

क्षयरोग नियंत्रण विभागाचे अधिकारी अशी माहिती घेण्यासाठी आल्यास त्यांना सहकार्य करा, असं आवाहन एफडीएकडून औषध विक्रेत्यांना करण्यात आलं आहे. तर अशी माहिती न ठेवणाऱ्या तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश एफडीएच्या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा