Advertisement

'टीबी हारेगा, मुंबई जितेगी' - टीबीमुक्त मुंबईसाठी सत्कार कार्यक्रम


'टीबी हारेगा, मुंबई जितेगी' - टीबीमुक्त मुंबईसाठी सत्कार कार्यक्रम
SHARES

भारतासह मुंबईला येत्या २०२५ पर्यंत टीबीमुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. हाच विश्वास सार्थ ठरावा म्हणून मुंबई महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर २०१७ पासून अगदी जोमाने कामाला लागले आहेत. हा उत्साह असाच कायम राहावा म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाकडून या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.


टीबी हा एक असा आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयातर्फे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जात आहेत. रुग्णांच्या हितासाठी असे जनजागृतीपर कार्यक्रम पुढेही राबवले जातील
- डॉ. दक्षा शाह, प्रमुख, क्षयरोग नियंत्रण विभाग

टीबीच्या जनजागृतीसाठी विशेष अॅनिमेशन फिल्म तयार करण्यात आली आहे. त्याचंही उद्घाटन या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलं. या फिल्मच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. शिवाय, टीबीबाबत माहिती देणारे बॅनर्स, पोस्टर्स बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवर लावण्यात आले आहेत. रेडियो चॅनल्सवर टीबीबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात येत आहे, असे आतापर्यंत टीबीमुक्त मुंबईसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. या सर्व कामांचा आढावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आला.


टीबी वॉरियर्सचा सत्कार 

या कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे जे टीबी वॉरियर्स टीबीमुक्त मुंबईसाठी तळागाळात जाऊन विशेष काम करतात त्यांचा सत्कार या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलं. त्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय, याच जोमाने या टीबी वॉरियर्सनी काम करत राहावं, ज्यामुळे पंतप्रधान मोदींचं २൦२५ पर्यंत टीबीमुक्त भारत हे स्वप्न साकार होईल. आणि टीबीमुक्त मुंबई होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल, असं मत कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी व्यक्त केलं.


टीबीमुक्त मुंबईसाठी आणखी काही उपक्रम

  • शीव रुग्णालयात लवकरच टीबी लॅब सुरू करण्यात येईल
  • बेड्याकुलिन हे औषध आता सर्वत्र उपलब्ध होईल
  • गरजू रुग्णांना हे औषध दिलं जाईल
  • एआयसी प्रोजेक्ट - एअर इंन्फेक्शन कंट्रोल प्रोजेक्ट देखील राबवला जातो. यामुळे हवेत असणाऱ्या जंतूवर नियंत्रण मिळवता येईल


पीएमपीटी गाईडलाइन्स

या कार्यक्रमांतर्गत लोकांना आणि डॉक्टरांना मार्गदर्शन केलं जात आहे. आतापर्यंत या कार्यक्रमातून १൦൦ सत्र घेण्यात आले आहेत. तर, २ हजार मेडिकल आणि पॅरामेडिकल डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे.


४൦൦ टॅबलेट्सची सुविधा

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून टीबीसाठी विशेष अॅनिमेशन फिल्म्स तयार करण्यात आल्या आहेत. त्या फिल्म्स प्रत्येक वॉर्डमध्ये टीबीसाठी काम करणाऱ्या डॉक्टर त्यांच्या विभागात दाखवू शकतील यासाठी ४൦൦ टॅबलेट्स पुरवले जाणार आहेत.

या कार्यक्रमाला महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, टीबी नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शाह आणि शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर उपस्थित होत्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा