Advertisement

ठाणे ते बेलापूर प्रवास अवघ्या अर्ध्या तासांचा होणार

या उन्नत मार्गामुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होऊन प्रवासाच्या वेळेत 40 मिनिटांची बचत होईल. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उपनगरातील प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे.

ठाणे ते बेलापूर प्रवास अवघ्या अर्ध्या तासांचा होणार
SHARES

नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळ 2025 अखेरीस कार्यान्वित होणार असून या विमानतळावर वेगाने पोहोचण्यासाठी ठाण्यातून सहापदरी उन्नत मागांची (six lane highway) निर्मिती केली जाणार आहे.

राज्य सरकारने नुकतीच या मार्गाला मंजुरी दिली आहे. सिडकोने या उन्नत मागांचा प्रकल्प अहवाल तयार केला असून सार्वजनिक, खासगी भागीदारीतून 'बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा' या तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

या उन्नत मार्गामुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होऊन प्रवासाच्या वेळेत 40 मिनिटांची बचत होईल. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उपनगरातील प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे.

मुंबई (mumbai) महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 2025 अखेरपर्यंत होणार असून उ‌द्घाटनानंतर दरवर्षी 2 कोटींहून अधिक प्रवाशांना येथून सेवा देण्यात येणार आहे.

या विमानतळावर ठाणे (thane), कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, उल्हासनगर या भागातून मोठ्या संख्येने प्रवासी दाखल होतील. त्यामुळे या भागातील प्रवाशांना नवी मुंबई विमानतळाशी जोडण्यासाठी सिडकोच्या पुढाकाराने ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान उन्नत मार्ग उभारला जाणार आहे.

यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून राज्य सरकारकडून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या भागामध्ये प्रवासासाठी ठाणे-बेलापूर मार्गाचा वापर केला जात आहे.

या रस्त्यावरून नवी मुंबईला जाण्यासाठी दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे मार्गावरील प्रवास प्रचंड कोंडीचा आणि वेळखाऊ ठरतो. नव्या उन्नत मार्गामुळे या प्रवासाच्या वेळेत 40 मिनिटांची बचत होणार आहे.

ठाण्यातील प्रवाशांसाठी 25.2 किमी लांबीचा, सहा मार्गिकांचा एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. ठाणे आणि वायव्य उपनगरातील प्रवाशांना प्रस्तावित ठाणे कोस्टल रोड भाग 2 आणि कोपरी-पटणी पुलाद्वारे जोडणाऱ्या नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट आणि अखंड प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने डिझाईन केला आहे.



हेही वाचा

प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे?

एलफिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी चार मेगाब्लॉक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा