Advertisement

टीबी रुग्णांना नकोय शिरा अन् उपमा

क्षय रुग्णांना भूक लागत नसल्याने त्यांना काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यातच त्यांच्याकडून उपमा व शिरा खाण्यास नकार दिला जात असल्याने आता नाश्त्यासाठी पर्यायी आहाराचा शोध सुरू आहे.

टीबी रुग्णांना नकोय शिरा अन् उपमा
SHARES

शिवडी रुग्णालयातील क्षयरोग रुग्णांनी आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून देण्यात येणारा शिरा आणि उपम्याचा नाश्ता खाण्यास नकार दिला आहे. रुग्णांनीच हा नाश्ता खाण्यास नापसंती दर्शवल्यामुळे अखेर हा नाश्ताच बंद करण्यात आला आहे. क्षय रुग्णांना भूक लागत नसल्याने त्यांना काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यातच त्यांच्याकडून उपमा व शिरा खाण्यास नकार दिला जात असल्याने आता नाश्त्यासाठी पर्यायी आहाराचा शोध सुरू आहे.


आहारास नापसंती

शिवडी रुग्णालयातील औषध प्रतिरोधी (एमडीआर) क्षय रुग्णांना सामाजिक बांधिलकी अर्थात सीएसआर अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आणि आयडीबीआय बँकेच्या समन्वयाने उपमा आणि शिरा हे खाद्यपदार्थ देण्यात येत होते. परंतु रुग्णांनी या आहारास नापसंती दर्शवल्यामुळे हा आहार थांबवण्यात आल्याचं महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.


नवीन आहार

त्यामुळे या रुग्णांना पर्यायी आहार देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानामार्फत नवीन पूरक आहारासाठी आहारतज्ज्ञ व तांत्रिक सल्लागार यांच्या सूचनेनुसार नवीन आहार योजना राज्य क्षयरोग अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत राबवण्यात येत असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केलं.


संतुलित आहाराचं महत्त्व

मुंबईतील २४ विभागांमध्ये २४ क्षयरोग अधिकारी व सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत कर्मचारी, आरोग्य, शिक्षण आदींची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून नियमित स्वरुपात संतुलीत आहार व क्षय रुग्णांसाठी पुरक आहाराचं महत्त्व पटवून देत असल्याचंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं.


पूरक आहारावर संशोधन

शिवडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीपकुमार आनंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही टीबी रुग्णांना मुळात भूकच लागत नसल्यामुळे त्यांना काहीही खाण्याची इच्छा होत नाही. केवळ नाश्ताच काय तर त्यांना दिलेलं जेवणही ते ५० ते ६० टक्के न जेवता टाकून देतात. त्यामुळे त्यांना खाण्याची इच्छा व्हावी यासाठी पूरक आहार काय असावा यावर संशोधन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

धक्कादायक! एकट्या मुंबईत टीबीचे ६६ टक्के रुग्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा