Advertisement

जागतिक क्षयरोग दिन - टीबीमुक्त मुंबईसाठी पालिकेचा रोड मॅप!

अनेकदा टीबी हा आजार औषधांना देखील दाद देत नाही. याच पार्श्वभूमीवर टीबीमुक्त मुंबईसाठी पालिकेने एक रोडमॅप तयार केला आहे. जानेवारी महिन्यातील सर्व्हेक्षणात ३०४ नवीन टीबी रुग्ण आढळून आले होते. तर, २ हजार ६൦३ एवढे संशयित रुग्ण आढळून आले होते.

जागतिक क्षयरोग दिन - टीबीमुक्त मुंबईसाठी पालिकेचा रोड मॅप!
SHARES

भारतासह मुंबईही टीबीमुक्त व्हावी यासाठी अनेक जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जात आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात टीबी रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. अनेकदा टीबी हा आजार औषधांना देखील दाद देत नाही. याच पार्श्वभूमीवर टीबीमुक्त मुंबईसाठी पालिकेने एक रोडमॅप तयार केला आहे. जानेवारी महिन्यातील सर्व्हेक्षणात ३०४ नवीन टीबी रुग्ण आढळून आले होते. तर, २ हजार ६൦३ एवढे संशयित रुग्ण आढळून आले होते.


टीबीमुक्त मुंबईचा पालिकेचा रोडमॅप

टीबीच्या जनजागृतीसाठी अॅनिमेशनपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून जनजागृती केली जाणार

टीबीबाबत माहिती देणारे बॅनर्स हार्बर रेल्वेच्या १५ स्थानकांवर लावण्यात आले आहेत

रेडियो चॅनल्सवर टीबीबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात येणार

मुंबईतील १० मोठ्या मॉल्समध्ये स्टॅन्डिजच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न


पालिकेचा टीबी प्रोग्रॅम २०१७

१८,००० संशयित रुग्णांना पालिकेतर्फे खासगी रुग्णालयात मोफत एक्स-रे सुविधा

८ नवीन कॅब-नेट मशिन बसवण्यात आल्या. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आता २८ कॅब-नेट मशिन्स उपलब्ध आहेत. त्यातून आत्तापर्यंत ७२ हजार लोकांची चाचणी करण्यात आली

१५० केमिस्टच्या माध्यमातून टीबी रुग्णांना मोफत औषधं देण्यात आली. याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला

मुंबईत टीबी रुग्णांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. ६,६०० पेक्षा जास्त संशयितांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली


मुंबईतील टीबी रुग्णांची सद्यस्थिती

२०१७ या वर्षात सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयातून ४५ हजार ६७५ टीबी रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. त्यात ४ हजार ८९१ औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचे रुग्ण, तर ६७൦ एक्स-डी-आर म्हणजे औषधांना अजिबात दाद न देणाऱ्या टीबीचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, २൦१६ मध्ये ४२ हजार ११५ टीबी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, ४ हजार ३७४ एमडीआर लेवलचे टीबी रुग्ण आढळून आले होते. तर, ५५५ हे एक्सडीआर लेवलचे रुग्ण आढळले होते.



हेही वाचा

धक्कादायक! एकट्या मुंबईत टीबीचे ६६ टक्के रुग्ण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा