बाईक अॅम्ब्युलन्स’ची सेवा सुसाट, 2 महिन्यांत 450 रुग्णांचे वाचवले प्राण

रस्त्यांवर असलेल्या ट्रॅफिकमधून वाट काढत अॅम्ब्युलन्स रुग्णालयात पोहचेपर्यंत चालकाच्या नाकी नऊ येतात. अनेकदा या रुग्णवाहिकांना चिंचोळ्या गल्ल्यांतून वाटही काढता येत नसल्याने बाईक अॅाम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळे गेल्या 2 महिन्यांत 450 आपत्कालिन रुग्णांचे जीव वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

2 ऑगस्टपासून ही सेवा मुंबईत सुरू करण्यात आली. या सेवेमुळे छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून वाट काढत आपत्कालिन परिस्थितीत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचवता येते. रस्त्यांवरील अपघात, सर्व गंभीर स्वरुपाचे रुग्ण, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले रुग्ण, हार्ट अटॅकचे रुग्ण किंवा विषबाधा अशा प्रकारच्या रुग्णांना या सेवेमार्फत सुविधा पुरवण्यात येत आहे.

मुंबईत 10 बाईक अॅतम्ब्युलन्सची सेवा

मुंबई शहर-उपनगरांत सध्या 10 बाइक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही सेवा दिली जात आहे. या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

108 हेल्पलाईन नंबरवर मिळेल सेवा

ही सेवा 108 या नि:शुल्क हेल्पलाइनच्या माध्यमातून उपलब्ध आहे. या नंबरवर जर संपर्क केला तर तुम्ही आहात त्या ठिकाणी ही सेवा काही मिनिटांत पोहोचते. मग, जर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक कुठल्याही प्रकारच्या अपात्कालीन परिस्थितीत सापडले असतील, तर नक्की या क्रमांकाचा वापर करा.

हेही वाचा - 

बाईक अॅम्ब्युलन्स सुसाट! 72 तासांत 35 रुग्णांवर उपचार!

बाइक अॅम्ब्युलन्समुळे मुंबईत 232 रुग्णांना आपत्कालीन सेवा


पुढील बातमी
इतर बातम्या