हात-पाय चालवत राहा, आळशी लोकांना कोरोनाचा जास्त धोका

आळस हा माणसाचा क्षत्रू आहे अशी म्हण प्रचलितच आहे. दुर्देवानं आता हे खरं ठरत आहे. कोरोनामुळे आळशी लोकांना मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं आता समोर आलं आहे. हे निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आलं आहे. हे संशोधन ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

जानेवारी आणि ऑक्टोबर २०२० दरम्यान अमेरिकेत करण्यात आला. कोरोनाची तीव्र लक्षणे व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये असून, कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. ज्या व्यक्तींनी कोरोनाची साथ येण्याच्या २ वर्ष आधीपासून व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. आयसीयूमध्ये त्यांना भरती करावे लागत असल्याचं नव्या अभ्यासात दिसून आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग धुम्रपान, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे. ५० हजार कोरोनाबाधितांचा या संशोधनासाठी अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत धुम्रपान, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब असलेल्यांना कोरोना संसर्गाचा आणि कोरोनामुळे जीविताचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जात होतं.

पण आता यापेक्षाही शारीरिक हालचाल न करणं, यामुळे कोरोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. ज्या व्यक्ती व्यायाम करत नव्हत्या. जे शारीरिक हालचालीही फार करत नव्हते, कोरोनाची लक्षणे अशा ४८ हजार ४४० लोकांमध्ये अधिक दिसून आली.


हेही वाचा

रिलायन्सकडून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळण्याची शक्यता

आणखी एक लस! कोरोनावरील रशियन लसीच्या चाचणीचा मार्ग मोकळा

पुढील बातमी
इतर बातम्या