Advertisement

रिलायन्सकडून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळण्याची शक्यता

ऑक्सिजनची मागणी राज्यात वाढत आहे, हे लक्षात घेता प्रशासनानंही कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवू नये म्हणून उपाययोजना सुरू केल्या आहेत.

रिलायन्सकडून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळण्याची शक्यता
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुजरातमधील जामनगर प्रकल्पातून महाराष्ट्राला सुमारे १०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली.

महानगर प्रदेश आणि शेजारच्या पुण्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी यावर नवी मुंबईतील तळोजा इथल्या लिंडे प्लांटमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर शिंदे यांनी ही घोषणा केली.

ऑक्सिजनची मागणी राज्यात वाढत आहे, हे लक्षात घेता प्रशासनानंही कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवू नये म्हणून उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात ऑक्सिजनच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. आम्ही आता काही तात्पुरती व्यवस्था केली आहे ज्यामध्ये गुजरातमधील रिलायन्स प्लांटमधून १०० मे.टन ऑक्सिजन मिळणार आहेत, ” असं शिंदे म्हणाले.

दरम्यान, लॉजिस्टिकचा प्रश्न उद्भवू नये यासाठी नायट्रोजन पुरवठा करणारा टँकर वापरले जातील. सर्व टँकरना पुरेसे पोलिस संरक्षण दिले जाईल, असं शिंदे म्हणाले.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे विश्लेषण करून त्यांच्या गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करण्यास सांगितलं आहे, असं ते म्हणाले.

रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या खासगी आस्थापनांनीही येत्या काही दिवसांत क्षमता आणि साठवण वाढीकडे लक्ष दिले पाहिजे, याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. आधीच्या लाटेपेक्षाही कोरोनाची दुसरी लाट अधिक भीषण आहे. राज्यात मागील काही दिवस दररोज ५० हजारांवर नवीन रुग्णांची भर पडत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.

मधल्या काळात उभारलेल्या आराेग्य सुविधाही आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. आॅक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनही कमी पडू लागले आहेत. ही स्थिती लक्षात घेता कोरोना संसर्गाची साखळी आपल्याला तोडावीच लागेल. 

ठाण्यात रविवारी ऑक्सिजनचा साठा संपल्यामुळे तब्बल २६ रुग्णांना पार्किंग प्लाझा कोविड सेंटर मधून ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तर काही रुग्णांना उपचारासाठी बेड देखील मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना जमिनीवर बसून उपचार घेण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार १४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून संचारबंदीची घोषणा केली आहे. ही संचारबंदी पुढील १५ दिवसांसाठी असेल. या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास सक्त मनाई असेल. संचारबंदीची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४०० कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेजही जाहीर केलं आहे. 



हेही वाचा

महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी, आज रात्री ८ वाजेपासून होणार लागू

मुंबई लोकल सुरुच राहणार, पण 'अशी' राहणार वाहतूक सुरू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा