Advertisement

रुग्ण वाढीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या प्रचंड चिंता वाढवणारी आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

रुग्ण वाढीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या प्रचंड चिंता वाढवणारी आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर देशात रोजची सर्वाधिक रुग्णवाढ ही महाराष्ट्रातच आहे.  

धक्कादायक म्हणजे नवीन रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या स्थानावर आहे.  जगात कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ ब्राझीलमध्ये होत आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेचा नंबर येतो. ब्राझील आणि अमेरिकेनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण वाढत आहेत. 

राज्यात मंगळवारी ६०,२१२ नव्या रुग्णांची नोंद झाली. ब्राझीलमध्ये सर्वात जास्त ८०,१५७ आण‍ि अमेरिकेत ७७,७२० नवीन रुग्ण आढळले आहे. जगातील ८.१ टक्के नवीन रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळून आले आहे. 

मंगळवारी २८१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ३१,६२४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या  ३५,१९,२०८ वर पोहोचली असून नाबळींचा आकडा ५८,५२६ इतका झाला आहे. आतापर्यंत २८, ६६,०९७ जण बरे झाले आहेत, तर सध्या ५,९३,०४२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत मंगळवारी ७८७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ८८०४ जणांनी कोरोनावर मात केली.  मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या  ५,३५,२६४ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा १२०९३ झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ४,३५,९५३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे आणि सध्या ८६,०९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा - 

पाण्याचा वापर जपून करा; मुंबईला ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

१५ दिवसांच्या संचारबंदीत काय सुरू, काय बंद? वाचा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा