Advertisement

मुंबई लोकल सुरुच राहणार, पण 'अशी' राहणार वाहतूक सुरू

१४ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

मुंबई लोकल सुरुच राहणार, पण 'अशी' राहणार वाहतूक सुरू
SHARES

१४ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी. अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये सार्वजनिक व्यवस्थेबाबत ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा सुरुच ठेवण्यात येणार आहे. मात्र, सर्वांना लोकल सेवेचा उपयोग करता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. शिवाय, रिक्षा, बस, टॅक्सी यांचीही प्रवासी वाहतूक सेवा सुरू राहणार आहे.

१४ एप्रिल रोजी संध्याकाळपासून आपण राज्यात १४४ कलम लागू करत आहोत. पुढचे १४ दिवस राज्यात संचारबंदी लागू करत आहोत. अनावश्यक फिरणं टाळावं. घराबाहेर पडू नका. जनता कर्फ्य म्हणजे आपण ठरवतो. तसं तुम्ही ठरवायचं आहे. कारण नसताना घराबाहेर पडणार नाही. मी कोरोनाला मदत करणार नाही, तर सरकारला मदत करणार असं ठरवायचं आहे. याबाबतचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना बंद राहतील. सकाळी सात ते रात्री आठ या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील', असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

'सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करत नाहीत. लोकल, बस बंद करत नाही आहोत. पण जीवनाश्यक काम करणाऱ्यांसाठी ही सुविधा सुरु राहतील. यामध्ये रुग्णालये, दवाखाने, वैद्यकीय सुविधा देणार, लस उत्पादक, विमा, लसींची वाहतूक सुविधा, वैद्यकीय कच्चा माल हे सगळेच. जनावारांशी संबंधित दुकानेही उगडे राहतील. शीतगृहे, हवाई वाहतूक, रेल्वे, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये सुरु राहतील', असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा