Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेची नवी रणनीती


कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेची नवी रणनीती
SHARES

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं राज्य सरकारनं मुंबईसह राज्यात पुन्हा लॉकडाउन लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं रुग्णालयं आणि कोरोना केंद्रांतील खाटा वाढवणे, नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक, पंचतारांकित हॉटेलातील खोल्या ताब्यात घेण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी या नवीन सूचना जारी केल्या आहेत.

प्रत्येक वार्डसाठी २ नोडल अधिकारी

वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची खाटा मिळवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. लक्षणे नसलेले रूग्ण खाटा अडवत असल्याचे आढळून आल्याने योग्य रुग्णांना खाटा मिळवून देण्यासाठी कठोर कार्यपद्धती अंमलात आणली जाणार आहे. प्रत्येक वार्डसाठी दोन नोडल अधिकारी नेमण्यात येणार असून हे अधिकारी दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत काम पाहणार आहेत. त्यामुळे सायंकाळी ७ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णांना खाटांसाठी वणवण करावी लागणार नाही. कोरोना रुग्णालये आणि कोरोना केंद्र या दोन्ही ठिकाणी हे अधिकारी समन्वय साधतील.

१२५ आयसीयूसह ११०० खाटा

महापालिकेनं मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये ३२५ अतिरिक्त आयसीयू खाटा वाढवल्या आहेत. त्यामुळे आयसीयू खाटांची संख्या २,४६६ वर गेली आहे, तर आतापर्यंत १९,१५१ खाटांचे वाटप डॅशबोर्डवरून झाले आहे. १४१ रुग्णालयांतील ३,७७७ खाटा रिक्त आहेत. करोना केंद्रांमध्ये येत्या सात दिवसांत १२५ आयसीयूसह ११०० अतिरिक्त खाटा उपलब्ध होतील.

३ जम्बो कोविड सेंटर

मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभी राहणार असून यामध्ये दोन हजार खाटा उपलब्ध होतील. यातील ७० टक्के खाटा ऑक्सिजन आणि २०० खाटा आयसीयूच्या असतील.

२४ तासांत अहवाल

खासगी प्रयोगशाळांना २४ तासांच्या आत चाचणी देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णांवर तातडीने औषधोपचार करता येतील. तसेच आवश्यक वाटल्यास रुग्णांना पुढील उपचारासाठी कुठे पाठवायचे याचीही वर्गवारी करणे शक्य होणार आहे.

हॉटेलमध्ये व्यवस्था

करोनामुक्त झाल्यानंतरही ज्यांना उपचाराची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची पंचतारांकित हॉटेलात व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये कोविड सेंटरप्रमाणेच प्रशिक्षित डॉक्टर आणि इतर सुविधा असतील. ज्यांना ज्या हॉटेलमध्ये राहणे परवडेल, त्यांनी तिथे राहावे, अशी ही व्यवस्था आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा