Advertisement

आणखी एक लस! कोरोनावरील रशियन लसीच्या चाचणीचा मार्ग मोकळा

रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' लसीच्या चाचणीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे देशात कोरोनावरील आणखी एक लसीच्या चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आणखी एक लस! कोरोनावरील रशियन लसीच्या चाचणीचा मार्ग मोकळा
SHARES

रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' लसीच्या चाचणीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे देशात कोरोनावरील आणखी एक लसीच्या चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. औषध नियामक कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही परवानगी मर्यादित वापरासाठी असेल.

रशियाच्या गामालय सेंटरने कोरोनावरील 'स्पुटनिक व्ही' लस विकसित केली आहे. स्पुटनिक लसीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासंबंधीची परिणामकारकता तपासल्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे. स्पुटनिक व्ही लस कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात ९२ टक्के परिणामकारक ठरत असल्याचा निष्कर्ष रशियन आयोग्य यंत्रणेने काढला आहे.

हेही वाचा - रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापूर्वी रुग्णाची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक

भारतामध्ये हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅब्ससोबत रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' लसीची मर्यादीत स्वरूपात चाचणी सुरू करण्यात येईल. या चाचण्यांचे अंतिम निष्कर्ष हाती आल्यानंतर लशीची परिणामकारकता तपासल्यानंतच लशीला भारतात मान्यता देण्यात येईल.

भारतात सीरम इंस्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन अशा दोन लसी वापरात आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात येत आहेत. या दोन लशींचाच त्यासाठी वापर करण्यात येत आहे. तिसऱ्या लशीची परिणामकारकता सिद्ध झाल्यास मोठा हातभार लागू शकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

याचसोबत अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या कोरोना लसीला देखील भारतात चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. या लशीची लवकरच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी केली जाणार आहे. या लशीची चाचणी यशस्वी झाली तर भारतातील लसीकरणाला आणखी वेग येईल.  

(russian sputnik v vaccine on covid 19 gets green signal for clinical trials in india)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा