Advertisement

रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला पाठवले १७६ आयसोलशन कोच

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या मदतीला रेल्वे धावून आल्याचं समोर आलं आहे.

रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला पाठवले १७६ आयसोलशन कोच
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या मदतीला रेल्वे धावून आल्याचं समोर आलं आहे. रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर करता येणार आहे. देशात ५५०हून अधिक, तर राज्यात १७६ आयसोलेशन कोच उपलब्ध असल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यात गेल्या २४ तासात ६३ हजार २९४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात रविवारी ३४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी इंजेक्शनच्या अपुऱ्या साठ्यासह खाटांची देखील कमतरता भासू लागली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या फैलावादरम्यान, कोरोना रूग्णांना खाटांची कमतरता भासण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी कोरोना रूग्णांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले होते.

यंदा देखील मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले आहेत. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा, प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचे रूपांतर बाथरूममध्ये करण्याची व्यवस्था तयार केली आहे. मुंबई विभागात १२८ आयसोलेशन कक्ष तयार आहेत. एका डब्यात २४ खाटा तयार करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेकडे मुंबई विभागात १२८ आयसोलेशन कोच आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर विभागात ४८ आयसोलेशन कोच तयार केले असल्याची माहिती मिळते आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा