COVID केअर सेंटरमधील प्रलंबित कामं ७ दिवसात पूर्ण करा : राजेश टोपे

महाराष्ट्र लोक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला जंबो कोव्हिड केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ICU, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरचे प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी टोपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ७ दिवसांची मुदत दिली आहे.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी टोपे यांनी सोमवारी सेंटर ऑफ इंजीनियरिंग पुणे इथं जंबो COVID सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्देश पुणे प्रशासनाला दिले आहेत. रूग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी मंत्री यांनी जंबो सेंटरमध्ये एक सुपर-स्पेशालिस्ट डॉक्टर नेमण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय औषधं आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणं यांची योग्य सुविधा मिळावी, असं प्रशासनाला सांगण्यात आलं आहे. जंबो सेंटरमध्ये सवलतीच्या दरात सिटी स्कॅन सुविधा सुरू करण्याचे निर्देशही टोपे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पुण्यातील वाढत्या COVID रुग्णांचा आकडा आणि मृत्यू यांसंदर्भात चिंता व्यक्त करताना टोपे यांनी पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये प्लाझ्मा देणगीसाठी शासकीय हेल्पलाइन क्रमांकाबाबत जनजागृती करण्यास प्रशासनाला सांगितलं आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका (पीएमसी) आयुक्त विक्रम कुमार आणि आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील आदींसह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टोपे यांनी पुण्यातील बाणेरलाही भेट दिली. ते म्हणाले की, “कोरोनाव्हायरस विरूद्धच्या लढाईत सर्वांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कोरेनाव्हायरसचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम महत्त्वाची आहे.”


हेही वाचा

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण

नवी मुंबईत महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५० टक्के वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या