सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पोलिसांचा कोरोनाने मृत्यू

ऑगस्ट महिन्यात राज्यात ५४, जुलैमध्ये ४३, जूनमध्ये ३३, मे मध्ये २३ तर एप्रिलमध्ये ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पोलिसांचा कोरोनाने मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाच्या काळात ही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. या कोरोना संक्रमणाच्या काळात आतापर्यंत २२२ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र सप्टेंबर महिना संपण्यासाठी अद्याप नऊ दिवस बाकी असताना या महिन्यात ६६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. एका महिन्यात पोलिस दलातील कोरोना मृ्त्यूंचा हा आतापर्यंतचा हा उच्चांक असून महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police)  दलातील वाढता कोरोनाचा आकडा चिंतेचा विषय ठरत आहे.

हेही वाचाः- माणकोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

गेल्या २४ तासांत राज्यात पाच पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा २२२ वर पोहोचला आहे. महिना संपायला नऊ दिवस शिल्लक असताना यापूर्वीचा कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांचा आकड्याने सप्टेंबर महिन्यात उच्चांक गाठला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ६६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सरासरी ३ पेक्षा जास्त पोलिसांना दरदिवशी मृत्यू होत आहे. यापूर्वी ऑगस्ट (August) महिन्यात राज्यात ५४, जुलैमध्ये ४३, जूनमध्ये ३३, मे मध्ये २३ तर एप्रिलमध्ये ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. गेल्या २४ तासांत राज्यात १५९ पोलिसांना कोरानाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या पोलिसांचा आकडा २१ हजार ३११ वर पोहोचला आहे. त्यातील तीन हजार ६५५ पोलिस सध्या सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शनिवार व रविवार या २४ तासांत राज्यात ठाणे शहर, नाशिक ग्रामीण, भंडारा,सोलापूर ग्रामीण व गोंदीया येथील पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचाः- मुंबईत पुढच्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, ठाणे व पुणे पोलिसांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक असताना जुलै महिन्यापासून राज्यातील ग्रामीण भागातील पोलिसांमध्येही कोरोनाचा मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला. राज्यातील ग्रामीण विभागातील पोलिसांमध्ये कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू चितेंचे विषय ठरत आहे. बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांतही ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू झाले. आता भंडारा, गोंदिया, सोलापूर ग्रामीण येथील पोलिसांचेही कोरोनामुळे मृत्यू ही बाब राज्य पोलिस दलासाठी चिंतेची आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध तुकड्यांमध्येही ऑगस्ट महिन्यात पोलिसांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा