Advertisement

“मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला अटक करायला हवी”

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक, सिनेनिर्माता अनुराग कश्यपवर केलेल्या आरोपांची चौकशी करून मुंबई पोलिसांनी अनुरागला अटक करायला पाहिजे होतं, असं म्हणत रिपाइंचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पायलला पाठिंबा दिला आहे.

“मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला अटक करायला हवी”
SHARES

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक, सिनेनिर्माता अनुराग कश्यपवर केलेल्या आरोपांची चौकशी करून मुंबई पोलिसांनी अनुरागला अटक करायला पाहिजे होतं, असं म्हणत रिपाइंचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पायलला पाठिंबा दिला आहे. तसंच याप्रमणी सीबीआय चौकशीचीही मागणी केली आहे. (mumbai police must arrest director anurag kashyap on the basis of actress payal ghosh allegations)

अभिनेत्री पायल घोष यांनी सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. पायलच्या आरोपांची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होतं. याप्रकरणी सीबीआय चौकशी होऊन पायल घोषला न्याय मिळवून दिला पाहिजे. पायल घोषसोबत दूरध्वनीवरून बोललो. तिला रिपाइंचा पाठिंबा राहील, असं म्हणत रामदास आठवले यांनी पायलला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा - भाजप, अभाविपमुळेच जेएनयूत हिंसा, अनुराग कश्यपचा थेट आरोप

अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. अनुराग कश्यपने माझा लैंगिक छळ केला तसंच असभ्य भाषेचाही वापर केला. मला वाईट वागणूक दिली गेली होती. या व्यक्तीवर कारवाई करा. क्रिएटिव्ह माणसाआडचा राक्षस देशाला पाहू द्या. माझ्या या ट्विटमुळे माला जीवाला धोका असून माझी मदत करा, असा आरोप पायलने केला आहे. शिवाय आपल्या ट्विटसोबत तेलगू वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. हे ट्विट करताना पायलनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग करून त्याच्याकडे मदत मागितली आहे. 

अनुराग कश्यपने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. आणखी आक्रमणं व्हायची आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. अनेकांचे फोन आले, की काही बोलू नकोस, शांत बस. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बस इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा