कोरोना व्हायरसवरील 'या' औषधाच्या किंमतीत घट, कंपनीनं रुग्णांसाठी घेतला निर्णय

जगासोबतच कोरोना भारतात देखील थैमान घालत आहे. अनेक देश कोरोनावर औषध बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अजून तरी कोरोनावर कुठलीही लस सापडली नाही. पण यादरम्यान काही जुनी औषधे पर्यायी औषध म्हणून वापरण्याचा प्रयत्न जगात सुरु आहे. त्यापैकीच एक आहे ग्लेनमार्क या भारतीय औषध कंपनीचे फॅबी-फ्लू हे औषध. सुरुवातीला या औषधाची किंमत जास्त होती. पण आता कंपनीनं औषधाच्या किंमतीत कमालीची घट केली आहे.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सनं गेल्या महिन्यात सुरू केलेल्या फ्लॅबी फ्लूच्या किंमतीत २७ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जेव्हा कंपनीने हे औषध बाजारात आणले तेव्हा एका टॅब्लेटची किंमत १०३ रुपये होती. आता याची किंमत ८० रुपयांपेक्षा कमी आहे. आता एक टॅबलेट अवघ्या ७५ रुपयांत उपलब्ध होईल.

COVID 19 ची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात येतं. याबाबत कंपनीनं सांगितलं की, औषधाचे अधिक उत्पादन झाले पाहिजे. जेणेकरून ते सर्वांपर्यंत पोहोचू शकेल. तसंच त्याची मागणी वाढल्यास फायदा देखील होईल.


हेही वाचा : ठाणे शहरात ‘शून्य कोविड मोहीम’


कोरोना संसर्गावरील उपचारासाठी फॅबीफ्लू हे गोळ्यांच्या रूपात सेवन करता येणारे पहिले फॅविपिराविर औषध आहे, असं ग्लेनमार्कने म्हटलं आहे. चाचणीमध्ये फॅबिफ्लूचा डोस दिल्यानंतर रुग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले. या एका गोळीची किंमत १०३ रुपये असणार आहे. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं अशी माहिती आणि सूचना ग्लेनमार्कचे अध्यक्ष ग्लेन सल्डाना यांनी सांगितलं आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी १८०० मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यांनतर १४ दिवसांपर्यंत ८०० मिलिग्रॅमचे दोन डोस दररोज घ्यायचे आहेत.

देशभरात कोरोनाचे सुमारे ९ लाख रुग्ण संक्रमित झाले आहेत. तर त्याच वेळी २२ हजारांहून अधिक लोकांचे प्राण कोरोनामुळे गेले आहेत. त्यात या कंपनीच्या औषधाच्या किंमती कमी करणं हा एक मोठा दिलासादायी निर्णय आहे.


हेही वाचा

कोरोनाची औषधं अधिकृत मेडिकलमध्येच मिळणार, 'ही' आहे यादी

कल्याण-डोंबिवलीत खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड पालिकेच्या ताब्यात

पुढील बातमी
इतर बातम्या