Advertisement

ठाणे शहरात ‘शून्य कोविड मोहीम’

कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी आता ठाणे शहरात ‘शून्य कोविड मोहीम’ राबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

ठाणे शहरात ‘शून्य कोविड मोहीम’
SHARES

ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वा्ढत आहे. कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी आता ठाणे शहरात ‘शून्य कोविड मोहीम’ राबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या मोहिमेत प्रभाग समिती स्तरावर नागरिकांची ताप तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये जे संशयित रुग्ण आढळतील त्यांची शीघ्र प्रतिजन चाचणी केली जाणार आहे. यामुळे रुग्णांचा शोध लवकर घेणं शक्य होणार आहे.

महापालिका  प्रशासनाने १ लाख प्रतिजन चाचणी संच (रॅपिड अ‍ॅन्टिजन किट) खरेदी केले आहेत. याद्वारे ठाणे शहरात शून्य कोवीड मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आला.

शीघ्र प्रतिजन संचाच्या माध्यमातून नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेची गरज नाही. त्यासाठी महापालिकेने वर्तकनगर, कळवा, टेंभीनाका आणि मानपाडा या भागांत नवीन तपासणी केंद्रे उभारली आहेत. 


अशी आहे मोहीम 

 - ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यामध्ये विविध पथकांमार्फत घरोघरी ताप तपासणी करण्यात येणार आहे.

- एखाद्या रुग्णामध्ये करोनाची लक्षणे किंवा ऑक्सिजन प्रमाण कमी आढळून आले, तर त्या व्यक्तीला तात्काळ जवळच्या केंद्रावर पाठवून तिथे त्याची रॅपिड अ‍ॅन्टिजन किटद्वारे चाचणी केली जाणार आहे.

- त्याचा अहवाल अर्ध्या तासात मिळणार आहे. यामुळे रुग्णाला तात्काळ उपचार देऊन त्याचे प्राण वाचविणे शक्य होणार आहे.

- त्याच्या संपर्कातील नागरिकांचे विलगीकरण करून कोरोना प्रादुर्भाव रोखला जाईल.


हेही वाचा -

‘धारावी पॅटर्न’ मध्ये पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

गूड न्यूज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा