Advertisement

कल्याण-डोंबिवलीत खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड पालिकेच्या ताब्यात

एखाद्या रूग्‍णाने अशा ८० टक्‍के नियंञणाखाली बेडवर उपचाराची मागणी केल्‍यास व बेड उपलब्‍ध असल्‍यास रूग्‍णास त्‍यावर उपचार देणे खासगी रूग्‍णालयाला अनिवार्य राहणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड पालिकेच्या ताब्यात
SHARES

कल्याण डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड आता पालिकेच्या ताब्यात आले आहेत. कोव्हिड अथवा नॉन कोव्हिड नोंदणीकृत खाजगी रूग्‍णालयातील पीआयसीयू, एनआयसीयू, डे-केअर, हिमोडायलिसिस रूग्‍ण बेड यातून वगळले आहेत.

एखाद्या रूग्‍णाने अशा ८०  टक्‍के नियंञणाखाली बेडवर उपचाराची मागणी केल्‍यास व बेड उपलब्‍ध असल्‍यास रूग्‍णास त्‍यावर उपचार देणे खासगी रूग्‍णालयाला अनिवार्य राहणार आहे. तसंच रूग्‍णावर उपचारापोटी शासनाने निर्धारित केलेल्‍या दरापेक्षा जास्‍त आकारणी करता येणार नाही. उर्वरित २० टक्‍के बेडवर उपचार घेणाऱ्या रूग्‍णांकडून रूग्‍णालयाने निश्चित केलेले दर आकारणी करण्‍यास परवानगी असेल. परंतू रूग्‍णालयातील ८० टक्‍के व २० टक्‍के बेडवर उपचार घेणा-या रूग्‍णाच्‍या उपचारात कोणत्‍याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही.

रूग्‍णालयात ८० टक्‍के व २० टक्‍के बेडस किती, त्‍यापैकी रिक्‍त किती व भरलेले किती, शासनाचे निर्धारित दर व रूग्‍णालयाचे दर, रूग्‍णालयाच्‍या दर्शनी भागावर प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. त्‍याचप्रमाणे रूग्‍णालयात येणाऱ्या रूग्‍णाला व त्‍याचे नातेवाईकांना दराबाबत व ८० टक्‍के नियंञणाखालील रिक्‍त बेडबाबत सविस्‍तर माहिती दयायची आहे.

रूग्‍णालयातील अत्‍यावश्‍यक सेवेतील जे कर्मचारी कोरोना रूग्‍णांवर उपचार करण्‍यास नकार देतील व आपले कर्तव्‍य बजावण्‍यास कसुर करतील, असे कर्मचारी ‘ मेस्‍मा’ कायद्यांतर्गत कारवाईस पात्र राहतील त्‍याचप्रमाणे रूग्‍णांकडून अवाजवी दर आकारले जात असल्‍याबाबत तक्रारी पात्र झाल्‍यास अथवा शासनाच्‍या नोटिफिकेशनमधील निर्देशांचे उल्‍लंघन झाल्‍याचे निदर्शनास आल्‍यास, भारतीय साथरोग नियंञण अधिनियम १८९७, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५, महाराष्ट्र नर्सिंग होम (दुरूस्‍ती) कायदा २००६ अन्‍वये फौजदारी गुन्‍हा दाखल करण्‍यात येईल व महापालिकेने दिलेली नोंदणी रद्द करण्‍यात येईल. असेही आदेशात नमुद केलेले आहे.

रुग्णालयातील अवाजवी दराबाबत वा बेड उपलब्धतेबाबत तक्रार असल्यास महापालिका मुख्यालयातील वॉररुममधील ०२५१-२२११८६ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.हेही वाचा -

‘धारावी पॅटर्न’ मध्ये पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

गूड न्यूज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढ
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा