कोरोनातून बरे झाल्यानंतर असा असावा आहार

कोरोनाच्या (Coronavirus) संसर्गापासून बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण कोविडमधून बरं झाल्यानंतर थकवा ही एक सामान्य समस्या समोर येत आहे आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारातील काही पदार्थांचा समावेश करून आपली ऊर्जा परत मिळवू शकता.

आहारात या पदार्थांचा समावेश असावा

१) भिजवलेले बदाम आणि मनुके

कोविड -19 चा थकवा टाळण्यासाठी भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊन दिवसाची सुरूवात करा. बदामांमध्ये प्रथिनं समृध्द असतात आणि मनुका शरीराला चांगले आयरन देते. म्हणून भिजलेले बदाम आणि मनुकाचे नियमितपणे सेवन केल्यास फायदा होतो.

२) नाचणी डोसा आणि दलिया

थकवा दूर करण्यासाठी नाचणी डोसा किंवा एक वाटी दलिया खाणं हा उत्तम पर्याय आहे. सकाळसाठी हा एक चांगला आहार आहे. यामुळे शरीरात ऊर्जा येते आणि थकवा जाणवत नाही.

३) गूळ आणि तूप 

दुपारच्या जेवणानंतर किंवा जेवण्यात गूळ आणि तुपाचे सेवन करणं फायदेशीर आहे. पोषक घटकांनी समृद्ध हे मिश्रण पोळी सह देखील खाऊ शकता. हे जलद रिकव्हरी होण्यात मदत करतात. गूळ आणि तूप दोन्ही शरीराला उष्ण आणि मजबूत ठेवण्यात मदत करतात.

४) रात्री खिचडी खा

कोरोनाहून बरे झाल्यावर रात्रीचे जेवण जड नसावे. रात्री हलकं जेवण घ्यावं. रात्री खिचडी खाणं चांगला पर्याय आहे. खिचडीमध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. हे पोटासाठी देखील सौम्य आहे. यामध्ये आपण भाज्या घालून याची चव वाढवू शकतो.

५) हायड्रेट रहा

शरीराला हायड्रेट होणे खूप महत्वाचं आहे. पुरेसे पाणी पिण्या व्यतिरिक्त नियमितपणे घरगुती लिंबाचा रस आणि ताक घ्या. यामुळे रीफ्रेश वाटेल आणि शरीरात साठलेले विष बाहेर येईल.

प्रोटीनयुक्त आहाराचे फायदे

  • प्रोटीनयुक्त आहार स्नायूंना बळकटी देतो.
  • श्वसनाच्या स्नायूंना देखील बळकट करेल.
  • त्यात असणारे आवश्यक अमीनो ऍसिड हानिकारक सूक्ष्मजंतूंपासून आपलं संरक्षण करतात.
  • माइक्रोन्यूट्रिएंट्स देखील आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ते देखील प्रोटीनयुक्त आहारातून मिळतात.


हेही वाचा

योगा कराल तर, फायद्यात रहाल!

आला पावसाळा, लेप्टोपासून सांभाळा!

पुढील बातमी
इतर बातम्या