Advertisement

मुंबईत कोरोना रुग्णवाढ दुपटीचा कालावधी ७२२ दिवसांवर

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या आढळत आहे. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ५७० नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णवाढ दुपटीचा कालावधी ७२२ दिवसांवर
SHARES

मुंबईत (mumbai) कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी (duration of doubling of coronavirus patients) आता तब्बल ७२२ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना हा मोठा दिलासा आहे. 

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या आढळत आहे. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ५७० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रिकव्हरी रेट आता ९५ टक्के इतका झाला आहे. 

मंगळवारी मुंबईत ३२ हजार ३०७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सध्या मुंबईत १४ हजार ४५३ सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. १५ जून ते २१ दरम्यान कोरोन रुग्ण वाढीचा दर ०.०९ टक्के इतका आहे. रुग्णसंख्या घटल्याने कंटेन्मेंट झोनचीही संख्या घटली आहे. मुंबईत सध्या ११ कंटेनमेंट झोन आहेत. 

मुंबईत लसीकरणावर देखील भर दिला जात आहे. केंद्राकडून सव्वा लाख लशींचा साठा मुंबईला प्राप्त झाला आहे. त्यामुळे जवळपास दोन लाख लशींचा साठा सध्या पालिकेकडे सध्या झाला आहे. वेगाने लसीकरण करण्यासाठी केंद्रातील लशींचा साठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहरात शारीरिक आणि मानसिकदृष्टया अपंग असलेले, परदेशात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जाणारे आणि स्तनदा माता यांच्या लसीकरणासाठी कस्तुरबा, केईएम, सेव्हन हिल्स, कुपर, शताब्दी रुग्णालय (गोवंडी), दहिसर जम्बो रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय येथे थेट लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. 

     


हेही वाचा -

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

  1. वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा