COVID 19 लसीच्या केईएम रुग्णालय घेणार चाचण्या

मुंबईतील केईएम हॉस्पिटल हे देशभरातील १० केंद्रांपैकी एक आहे जे ऑक्सफोर्ड विद्यापीठात विकसित झालेल्या लसीचा वापर करणार आहे. कोरोनाव्हायरसवर उपचार करणारी संभाव्य औषध COVID shild या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सचं आयोजन KEM तर्फे करण्यात येणार आहे.

लसीची चाचणी यू.के इथल्या ऑक्सफर्डमध्ये झाली. या चाचणीत लसीची क्लिनिकल कार्यक्षमता तपासण्यात आली. त्यामध्ये लस कुठल्याही दुष्परिणामांशिवाय सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं.

दुसरीकडे, रशियन आरोग्य मंत्रालयानं १५ ऑगस्ट रोजी घोषणा केली की, “COVID 19” वरील लसीचे उत्पादन सुरू करण्ययात आले आहे. येत्या काळात याचे उत्पादन वाढवण्यात येईल. यासोबतच मॉस्कोनं दावा केला की ही जगातील पहिली यशस्वी लस आहे.

हेही वाचा : ठाण्यात रुग्णदुपटीचा कालावधी ३७ दिवसांवर

वृत्तानुसार, या लसचे नाव स्पुतनिक व्ही ठेवलं गेलं आहे. कोरोनाव्हायरस वरील ही लस रशियन आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्यानं गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूटनं तयार केली आहे. या महिन्याच्या अखेरीस ही लस बाजारात आणली जाईल. तथापि, येत्या काळात उत्पादनाचा वेग वाढवण्यात येईल. कोरोनाव्हायरस विरूद्ध लढाईत ही लस फायदेशीर ठरू शकेल असा दावा करण्यात येत आहे. पण जगभरातून या लसीवर संशय व्यक्त केला जातोय.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या एका मुलीला कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस दिली गेली होती.


हेही वाचा

बोरीवलीत १ हजारहून अधिक कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण

परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइनमध्ये सूट

पुढील बातमी
इतर बातम्या