Advertisement

बोरीवलीत १ हजारहून अधिक कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई उपनगरातील बोरीवलीमध्ये सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेची चिंता वाढत आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला बोरीवलीमध्ये १ हजारहून अधिक अॅक्टिव्ह केस आहेत.

बोरीवलीत १ हजारहून अधिक कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण
SHARES

मुंबई उपनगरातील बोरीवलीमध्ये सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेची चिंता वाढत आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला बोरीवलीमध्ये १ हजारहून अधिक अॅक्टिव्ह केस आहेत. 

इतर २४ वाॅर्डापैकी बोरीवलीत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे इमारतीत राहणारे आहेत. इथले संशयीत रुग्ण शोधून काढणे आणि रुग्णांवर ताबडतोब उपचार करणं महापालिकेसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

सध्याच्या घडीला शहर आणि उपनगरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २० हजारांहून कमी आहेत. अंधेरी-विलेपार्ले, मालाड, दादर-धारावी, भांडुप या भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १ हजारांपेक्षा कमीच आहे. येथील रुग्ण दुपटीचा कालावधी देखील जास्त आहे. परंतु बोरीवलीत परिस्थिती फारशी चांगली नाही.

बोरीवलीत अँटिजन चाचण्या करण्याचं काम वेगात सुरू आहे. एकूण आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण इमारतींमधील आहेत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्याने दिली.  

मुंबई उपनगरात सोशल डिस्टन्सिंग, मास्क इत्यादी नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसून येतं. कोरोना विषाणूला आळा घालण्यात हेच दोन महत्त्वाचे मुद्दे ठरतात. त्यामुळे येथील स्थानिकांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन करून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढवण्याचं आव्हान स्वीकारलं पाहिजे.

हेही वाचा- कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, १ हजार कैदी २९२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे येथील रुग्णदुपटीचा कालावधी आता ३७ दिवसांवर पोहोचला आहे. एक महिन्यापूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णदुपटीचा कालावधी २२ दिवस होता. 

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला होता. मात्र, येथील रुग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे.  मुंब्रामध्ये रुग्णदुपटीचा कालावधी सर्वाधिक ६१ दिवसांवर गेला आहे.  घोडबंदरमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी सर्वात कमी म्हणजे ३० दिवसांचा आहे. एक महिन्यापूर्वी घोडबंदर भागात हा कालावधी १६ दिवसांचा होता. 

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल केला होता. त्यानंतर येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. येथे दररोज ४०० ते ५०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन लागू केला होता. १९ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन कायम होता. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आलं.

हेही वाचा- नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७३ रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा