कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, १ हजार कैदी २९२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

या महामारीने आतापर्यंत ६ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या सर्वा कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, १ हजार कैदी २९२ कर्मचाऱ्यांना  कोरोनाची लागण
SHARES

राज्याच्या कारागृहांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवेसंदिवस वाढू लागला आहे. राज्याच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या  १ हजार कैद्यांना तर २९२ तुरुंगातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या महामारीने आतापर्यंत ६ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या सर्वा कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्चन्यायलयाने राज्य सरकारकडे जैलमधील कैद्यांबाबत विचारपूस केली होती. त्यात त्यांनी जेलमधील कैद्यांमध्ये कोरोना संसर्ग आहे का? अशी विचारणा केली होती. कोरोना प्रादर्भाव वाढु लागल्याने, याचा संसर्ग कारागृहातील कैद्यांना बसू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहातुन तब्बल ११ हजारहून अधिक कैद्यांची प्रशासनाने टप्या टप्याने सुटका केली. कारागृहात कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करुन त्यांना सोडण्यात आले. तर काही कारागृहात थर्मल टेम्परेचरच्या सहाय्याने कैद्यांची चाचणी करुन त्यांना सोडण्यांस आले. सर्वाच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर सरसकट कैद्याना बाहेर न सोडता त्यांच्याकडून जामिनपत्र लिहुन घेतले जात आहे. त्यानुसार, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल व्यवस्थित असेल अशाच कैद्याना जामीनावर बाहेर सोडले जात आहे.

हेही वाचाः- लॉकडाऊनचा बेस्टला फटका; तब्बल १५० कोटींचा तोटा

दरम्यान हजारो कैद्यांना सोडून देखील कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळेच तुरुंगात कोरोना झालेल्या कैद्यांसाठी आता विशेष क्वारनटाइन सेंटर कारागृह प्रशासनाने तयार केली आहेत. तुरुंगाजवळील न वापरातल्या खासगी इमारती ताब्यात घेऊन कारागृह प्रशासनाने अशी २३ क्वारनटाइन सेंटर तयार केली असून त्यात ११०१ कैद्यांना क्वारनटाइन करण्यात आले आहे. त्यात ५७ महिला कैद्यांचा ही समावेश आहे.

हेही वाचाः- म्हणून गणपती मंडळांकडून पालिका लिहून घेणार ‘विशेष हमीपत्र’

संबंधित विषय