Advertisement

म्हणून गणपती मंडळांकडून पालिका लिहून घेणार ‘विशेष हमीपत्र’

पालिकेने गणपती मंडळांना आॅनलाइन (एक खिडकी) पद्धतीने परवानगी देण्यास सुरूवात केली आहे.

म्हणून गणपती मंडळांकडून पालिका लिहून घेणार ‘विशेष हमीपत्र’
SHARES

मुंबई मोठ्या थाटामाटात सारा केला जाणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अनेक मंडळांनी आपली भूमिका स्पष्ठकरत उत्सव साध्यापद्धतीत आणि शासनाने दिलेल्या अटींनुसार साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच पालिकेने गणपती मंडळांना आॅनलाइन (एक खिडकी) पद्धतीने परवानगी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र यंदा प्रथमच कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमिवर पालिका मंडळ आणि मूर्तीकारांकडून ‘विशेष हमीपत्र’ लिहून घेणार आहे.

हेही वाचाः- शुक्रवारी जाहिर होणार 'आयसीएसई'चा १०वी, १२वीचा निकाल

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेने ऑनलाइन पद्धतीने परवानगी देण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज व कार्यवाही करता येणार असल्याने अर्जदारांचा वेळ वाचणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मुदत १९ ऑगस्ट २०२० सायंकाळी ५.३०पर्यंत वेळ असणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच यासाठी अर्ज करताना, त्यासोबत मुंबई पोलिस व वाहतूक पोलिसांचे 'ना-हरकत प्रमाणपत्र'ही आवश्यक असते. यामध्ये बराच वेळ जात असल्याचे लक्षात घेऊन पालिकेने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने ही परवानगी प्रक्रिया मागील वर्षापासून मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून ऑनलाइन केली आहे. पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर सादर होणारा अर्ज स्वयंचलित पद्धतीने पोलिसांकडे व वाहतूक पोलिसांकडे जाऊन कार्यवाही होणार आहे. पोलिस व वाहतूक पोलिसांनी अर्ज प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत त्यांची 'हरकत' किंवा 'ना-हरकत' नोंदविणे अपेक्षित आहे. 'ना-हरकत' दिल्यानंतर अर्जावर पालिकेच्या प्रभाग कार्यालयाद्वारे आवश्यक ती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येईल. यानंतर संबंधित अर्जदारास ई-मेलद्वारे अर्ज मंजूर झाल्याची माहिती दिली जाईल. त्यामुळे मंडळांचा पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडे परवानगीसाठी फेऱ्या मारण्याची गरज नाही.

हेही वाचाः- रेल्वे तिकीट खिडक्यांवर नोटा निर्जंतुकीकरण यंत्र

दरम्यान यंदा मंडळांकडून परवानगीसाठी आकारण्यात येणारे नाममात्र शुल्क १००/- हे या वर्षी कोविड साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमिवर या वर्षी आकारले जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ठ केले आहे. तसेच मागीलवर्षी ज्या मंडळांना आँनलाईन पद्धतीने परवानगी देण्यात आली होती. त्या मंडळांना त्वरित परवानगी दिली जाईल, त्यासाठी त्यांनी मागीलवर्षी दिलेल्या परवानगी क्रमांक अर्जामध्ये न चुकता नमूक करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा पहिल्यांदाच पालिका मंडळ आणि मूर्तीकार यांच्याकडून ‘विशेष हमीपत्र’ लिहून  घेणार आहे. आँनलाईन पद्धतीने हे हमीपत्र डाऊनलोड करून त्यापत्रावर संबधितांनी सह्याकरून ते पून्हा अर्जास अपलोड करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा