Advertisement

रेल्वे तिकीट खिडक्यांवर नोटा निर्जंतुकीकरण यंत्र


रेल्वे तिकीट खिडक्यांवर नोटा निर्जंतुकीकरण यंत्र
SHARES

कोरोनाच्या संसर्गापासून लांब राहण्यासाठी अनेकांनी विविध उपाय केले आहेत. सामाजिक अंतर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत वाहतूक सेवा सुरु झाली असून, कोरोनाचा सर्वाधिक धोका हा देवाणघेवाण करण्यात आहे. त्यामुळं खबरदारीचा म्हणून बेस्ट उपक्रमानं क्यूआर कोडची व्यवस्था केली आहे. अशातच आता रेल्वे प्रशासनाने अनोखी शक्कल लढवत सॅनिटाइज करणारे प्रिंटर बसविले आहेत.

कोरोना संक्रमणापासून बचावासाठी मध्य रेल्वेने तिकीट खिडक्यांवर नोटा सॅनिटाइज करणारे प्रिंटर बसविले आहे. बेस्ट उपक्रमाने नोटांची देवाणघेवाण कमी व्हावी म्हणून वाहकांकडे क्यूआर कोड असलेले ओळखपत्र देण्यास सुरुवात केली असून, प्रवासी ओळखपत्रावरील कोड स्कॅन करून यूपीआय अ‍ॅपद्वारे तिकिटाचे पैसे भरू शकतो. दरम्यान, रेल्वेकडे बनावट नोटा ओळखणारे छोटे प्रिंटर (अल्ट्रावॉयलेट मशीन) आहेत. या यंत्रातूनच सॅनिटाइजरची फवारणी नोटांवर होते. यात प्रवाशांचा वेळही जात नाही.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, भायखळा, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, इगतपुरी, आसनगाव, पनवेल, वाशी, बेलापूर, कर्जत, लोणावळा स्थानकातील मेल-एक्स्प्रेसच्या तिकीट खिडक्यांवर तसेच ४९ उपनगरीय स्थानकांतील ८७ तिकीट खिडक्यांवर ही यंत्रे बसवण्यात आली. प्रवाशांकडून नोटा देवाणघेवाण करताना फवारणी केली जात आहे.

तिकीट तपासनीसांकडंही पोर्टेबल पब्लिक उद्घोषणा यंत्र देण्यात आले आहे. यातून तिकीट तपासनीस ५ ते ६ फूट अंतरावरील प्रवाशांना सामाजिक अंतर राखावे आणि अन्य मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा - 

मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा