Advertisement

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या

पालिकेकडून कमी चाचण्या होत असून प्रशासन आकडेवारी योग्यरित्या देत नसल्याचे आरोप महापालिकेने फेटाळून लावले आहेत.

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या
SHARES

मुंबईत कोरोना चाचण्यांची क्षमता वाढली असून आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या झाल्या असल्याची महिती मुंबई महापालिकेने दिली आहे. पालिकेकडून कमी  चाचण्या होत असून प्रशासन आकडेवारी योग्यरित्या देत नसल्याचे आरोप महापालिकेने फेटाळून लावले आहेत. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासूनच नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करुन प्रशासनाने चाचण्या केल्या आहेत. ३ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. तर ११ मार्च रोजी पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला.

३ फेब्रुवारी ते ६ मे  या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर १ जून  रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. २४ जून रोजी ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. ८ जुलैपर्यंत एकूण ३ लाख ६४ हजार ७५३ चाचण्या झाल्या आहेत अशी माहिती महापालिकेने दिली आहे.हेही वाचा - 

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा