Advertisement

शुक्रवारी जाहीर होणार 'आयसीएसई'चा १०वी, १२वीचा निकाल


शुक्रवारी जाहीर होणार 'आयसीएसई'चा १०वी, १२वीचा निकाल
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मुंबईसह राज्यभरातील सर्व शाळा, कॉलेज मागील ३ महिन्यांपासून बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ही राखडल्या. लॉकडाऊनपूर्वी १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असून,निकालाबाबत सर्व विद्यार्थ्यांना चिंता होती. त्याचप्रमाणे १० च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा १ पेपर शिल्लक राहिला असून, निकालाबाबत घोंधळ निर्माण झाला होता. मात्र, आता सीआयएससीई या मंडळाच्या १०वी व १२वीच्या परिक्षांचा निकाल जाहिर होणार आहे.

‘काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (सीआयएससीई) या मंडळाचा १०वीचा (आयसीएसई) आणि १२वीचा (आयएससी) निकाल शुक्रवारी दुपारी ३ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. डिजीलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणपत्रकही घेता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीनं पुनर्मुल्यांकनासाठीही अर्ज करता येणार आहे.

विद्यार्थी आयोगाच्या www.cisce.org या संकेतस्थळावर निकाल पाहू शकणार आहेत. दरम्यान, परीक्षेचा निकाल जाहिर होणार असल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनमध्ये निकालाबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याशिवाय यंदा या परीक्षेचा निकाल किती टक्के लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा - 

मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा