राज्यातील कारागृहातून आतापर्यंत 5105 कैद्यांची सुटका


राज्यातील कारागृहातून आतापर्यंत 5105 कैद्यांची सुटका
SHARES

देशात कोरोना प्रादर्भाव वाढु लागल्याने, याचा संसर्ग कारागृहातील कैद्यांना बसू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहातुन तब्बल 5 हजार 105 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. तसेच टप्याटप्प्याने 11 हजार कैद्यांची सुटका करण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.

अनेक कारागृहात कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करुन त्यांना सोडण्यात येत आहे. तर काही कारागृहात टेम्परेचर गनच्या सहाय्याने कैद्यांची चाचणी करुन त्यांना सोडण्यांस सुरुवात केलीआहे. तर काही कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय अहवाल बाकी असुन, त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांना देखील दोन टप्यात सोडण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाने सागंतिले. तसेच राज्यातील विविध मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहात कैदेत असलेल्या कच्च्या कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया देखील कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे. सर्वाच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर सरसकट कैद्याना बाहेर न सोडता त्यांच्याकडून जामिनपत्र लिहुन घेतले जात आहे. त्यानुसार, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल व्यवस्थित असेल अशाच कैद्याना जामीनावर बाहेर सोडले जात आहे.

त्यानुसार, लॉकडाऊनच्या कालावधीत 5 हजार 105 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून 582 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ तळोजा कारागृातून 498, ठाणे कारागृहातून 443 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे . असेच पुढेही टप्याटप्याने 11 हजार कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. जामिनावर सोडलेल्या कैद्यामध्ये सात वर्षापेक्षा अधिक तसेच सात वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैदी त्याचप्रमाणे, दोन वेळा पॅरोलवर जाऊन नियमानुसार आतमध्ये आलेल्या कैद्यांना सोडण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सात कारागृहांमध्ये पूर्ण पणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा