Advertisement

लॉकडाऊनचा बेस्टला फटका; तब्बल १५० कोटींचा तोटा


लॉकडाऊनचा बेस्टला फटका; तब्बल १५० कोटींचा तोटा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं मागील ३ महीने अनेकांना राज्य सरकार व महापालिका प्रशासनानं घरी राहण्याचा सल्ला दिला होता. त्याशिवाय, सर्वच यंत्रणा, कारखाने, दुकानं, बाजारपेठ कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं अनेकांना घरी राहून काम कराव लागलं. परिणामी वाहतूक सेवाही समान्यांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सेवा सुरु ठेवण्यात आली होती. त्यामुळं मागील ३ महीने बेस्टला तब्बल १५० कोटींचा तोटा सहन करावा लागतो आहे.

मागील ३ महिने निरंतर वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्टचे एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये सुमारे १५० कोटी रुपयांचे उत्पन्न घटलं आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलीकरणानंतरही बेस्टची प्रवासी संख्या न वाढल्यानं सध्या उत्पन्न कमी, खर्च जास्त अशी बेस्टची अवस्था आहे.

मुंबईत मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपली वाहतूक सेवा बंद ठेवली. मात्र, बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टसेवा सुरू ठेवली. लॉकडाऊनपूर्वी बेस्टला परिवहन सेवेतून दररोज १ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळत होते. खर्च साधारण ३ कोटी रुपयांपर्यंत होता. ८ जूनपासून बेस्टची नियमित धाव सुरू झाली असली तरी अजूनही बेस्टचे उत्पन्न १ कोटी रुपयांच्या पुढे गेलेले नाही.

विशेष म्हणजे कोरोनामुळं खर्चात वाढ झाली असून, कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील ३ महिन्यापूर्वी प्रत्येक किलोमीटरमागे ११५ रुपये खर्च बेस्टला होत होता. तर उत्पन्न ६० रुपयांपर्यंत होते. पण आता ते कमी झाले आहे.

बेस्टची आर्थिक स्थिती बिकट

  • एप्रिल महिन्यात बेस्टला जेमतेम १० ते १५ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
  • मे महिन्यातही हीच परिस्थिती होती.
  • जूनमध्ये थोडीफार वाढ झाली.
  • ८ जुलैपर्यंत बेस्टची प्रवासी संख्या १०,०७, ७६०पर्यंत पोहोचली.
  • दररोजचे उत्पन्नही ८९.५६ लाखांवर गेले.
  • आधीच्या तुलनेत कमीच आहे.

या कारणांमुळं बेस्टसमोर उत्पन्नवाढीचं मोठं आव्हान आहे. त्यावर जास्तीत जास्त बसगाड्या उपलब्ध करणे आणि प्रवासी संख्या वाढवणे इत्यादी पर्याय निवडावे लागणार आहे. कोरोनाच्या धास्तीने मार्चपासूनच प्रवाशी कमी होऊन बेस्टचे उत्पन्न बुडण्यास सुरूवात झाली होती. आताही सामाजिक अंतराचे नियम पाळण्याकरिता मर्यादित प्रवासी, कमी बसगाड्या अशा अनेक कारणांमुळेही अद्याप प्रवासी संख्या वाढलेली नाही. त्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत मिळू शकलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५० कोटी रुपये उत्पन्न बुडाल्याचं समजतं.



हेही वाचा - 

मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा