नवीन कैद्यांसाठी 'हे' आठ कारागृहात आजपासून बंद


नवीन कैद्यांसाठी 'हे' आठ कारागृहात आजपासून बंद
SHARES
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस  वाढत असताना, कारागृह प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील आर्थररोड भायखळा, ठाणे, कल्याण, येरवडा, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक कारागृह कैद्यांसाठी लाँकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे या तुरूंगात आता नवीन कैद्यांना प्रवेश बंदी असणार आहे. राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी आज ही घोषणा केली.

राज्यातील कारागृहांतील क्षमतेच्या तुलनेत त्यात कैद्यांची संख्या दुप्पट आहे. त्यातच आर्खररोड मधील 158 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळेच राज्यातील 60 हजार कैद्यांपैकी 50 टक्के म्हणजेच 17 हजार कैदी सोडण्याचा निर्णय गृहमंञी अनिल देशमुख यांनी घेतला आहे. यापूर्वी सात वर्षांपेक्षा कमी सजा असलेल्या गुन्ह्यातील 5105 न्यायाधीन बंदी यांना  तात्पुरत्या जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.तसेच 3017  शिक्षाधीन बंद्यांना  इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील न्यायाधीन 9520बंद्यांना  तात्पुरते जामिनावर सोडण्यात येणार आहे. असे एकूण 17 हजार 642  कैदी कारागृहातून मुक्त होणार आहेत.

या कैद्यांमध्ये प्रामुख्याने  मोकोका, टाडा, पोटा, यूएपीए,  पीएमएलए, एनडीपीएस, एमपीएडी, आयटी अँक्ट, पोस्को, बँक घोटाळा, आर्थिक घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या कैद्यांचा समावेश  असल्याचे गृहमंञी अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. कोरोना विषाणु चा संसर्ग रोखण्याकरीता राज्यातील सर्व कारागृहात प्रबोधन केले जात आहे तसेच एक चित्रफीत सुद्धा दाखवण्यात येत आहे. यामुळे बंद्यांमध्ये मोठी जागरुता निर्माण होउन, बंद्यांचे आरोग्य व्यवस्थीत ठेवण्याकरीता येथील डाॅक्टर व सर्व कर्मचारी प्रयत्न करत असल्याचे गृहविभागाकडून सांगण्यात आले आहे.

देशातील वाढत असलेला करोना संसर्ग पाहुन, आज पासुन काही महत्वाच्या कारागृहात पुर्ण लाॅकडाउन करण्यात येत आहे, कारण नवीन येणाऱ्या कैद्यास याची लागन झाली असल्यास आत मध्ये असलेल्या बंद्यांना धोका निर्माण होउ शकतो, म्हणुन लाॅकडाउन चा निर्णय घेण्यात आला आहे. रामानंद यांच्या नुसार या कारागृहात आजपासुन कोणताही नवीन बंदी घेतला जाणार नाही, पोलीसांनी नजीकच्या कारागृहात बंद्यांना पाठवयाचे असल्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा