Advertisement

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७३ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी (१४ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३७३ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३७३ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत शुक्रवारी (१४ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३७३ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २०,१३० झाली आहे.

शुक्रवारी बेलापूर ७५, नेरुळ ५६, वाशी ३७, तुर्भे ३१, कोपरखैरणे ५०, घणसोली ६३, ऐरोली ४९, दिघामध्ये १२ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५०, नेरुळ ७५, वाशी ३१, तुर्भे ३१, कोपरखैरणे २८, घणसोली ३५, ऐरोली ५० आणि दिघामधील ७ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६०६७ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ४९९ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत ७ हजार ९८० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. येथे एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८० टक्के झाला  आहे.  नवी मुंबईत एकूण ७५,३२७ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने प्रतिजन तपासण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आल्याने शहरात करोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या रुग्णांसाठी लागणारी पालिकेची आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर शहरातील करोना रुग्णाला दूरध्वनीवरून खाटा उपलब्ध करून  देण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. यासाठी ऑनलाइन माहितीफलक  तयार केला जात आहे.



हेही वाचा -

१५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अलर्ट

ठाण्यातील सर्व दुकानं १५ ऑगस्टपासून सुरू होणार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा