Advertisement

ठाण्यात रुग्णदुपटीचा कालावधी ३७ दिवसांवर

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे येथील रुग्णदुपटीचा कालावधी आता ३७ दिवसांवर पोहोचला आहे.

ठाण्यात रुग्णदुपटीचा कालावधी ३७ दिवसांवर
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे येथील रुग्णदुपटीचा कालावधी आता ३७ दिवसांवर पोहोचला आहे. एक महिन्यापूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णदुपटीचा कालावधी २२ दिवस होता. 


ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला होता. मात्र, येथील रुग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे.  मुंब्रामध्ये रुग्णदुपटीचा कालावधी सर्वाधिक ६१ दिवसांवर गेला आहे.  घोडबंदरमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी सर्वात कमी म्हणजे ३० दिवसांचा आहे. एक महिन्यापूर्वी घोडबंदर भागात हा कालावधी १६ दिवसांचा होता. 


ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल केला होता. त्यानंतर येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. येथे दररोज ४०० ते ५०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन लागू केला होता. १९ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन कायम होता. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आलं.


मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात रोज कोरोनाचे सरासरी १७० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत.  महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रामध्ये महिनाभरात रुग्ण दुपटीचा कालावधी १३ ते १८ दिवसांनी वाढला आहे. 



हेही वाचा - 

१५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अलर्ट

ठाण्यातील सर्व दुकानं १५ ऑगस्टपासून सुरू होणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा