लसीकरणानंतर मुंबईतील डॉक्टर ICU मध्ये दाखल

(Vaccine drive inauguration at BKC)
(Vaccine drive inauguration at BKC)

शनिवारी, १६ जानेवारीपासून देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याचा कार्यक्रम सुरू झाला. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दोन दिवसांत ४४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. पण त्यापैकी काहिंना त्रास झाल्याचं समोर आलं आहे.

रविवारी, १७ जानेवारीला मुंबईच्या एका डॉक्टरला व्ही.एन. देसाई हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल केलं गेलं आहे. COVID 19 लसीकरणानंतर त्याला चक्कर येणं, ताप, निर्जलीकरण आणि अशक्तपणा जाणवू लागला. व्ही. एन. देसाई हे मुंबईतील लसीकरणासाठी नियुक्त केलेल्या १० केंद्रांपैकी एक आहे.

व्ही. एन. देसाई हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या डॉ. जयराज आचार्य यांनी लसीकरणाच्या पहिल्या फेरीत १६ जानेवारीला रुग्णालयातच लस घेतली होती. २४ तासांच्या आत, लसीकरणानंतर आचार्य यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला.

ताप आणि चक्कर आल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीनं दाखल करण्यात आलं. जिथं ते आयसीयूत आहेत. जेव्हा रुग्णालयात प्रवेश केला गेला तेव्हा एका स्त्रोतानं सांगितलं की, “ते बराच काळ अस्वस्थ होते.”

लसीकरणाशी संबंधित प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मंगळवार, १९ जानेवारी रोजी त्यांना घरी सोडण्यात आलं.

याव्यतिरिक्त, महाराष्ट्रात २८० हून अधिक किरकोळ दुष्परिणामांची नोंद झाली आहे. यामध्ये ताप, शरीरावर वेदना आणि मुरुमांचा समावेश आहे. आतापर्यंत कोणालाही गंभीरपणे बाधा झाली नाही, असं प्रशासनानं सांगितलं.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की को-व्हीएन अर्जामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सोमवार, १८ जानेवारीपर्यंत कोव्हीड लसीकरण अभियान रद्द करण्यात आले होते.


हेही वाचा

महाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे

कोरोना मृतदेह हाताळण्यासाठी महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च

पुढील बातमी
इतर बातम्या