Advertisement

कोरोना मृतदेह हाताळण्यासाठी महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च

कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. शिवाय, काहींना आपल्या घरापासून लांब राहावं लागलं आहे.

कोरोना मृतदेह हाताळण्यासाठी महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च
SHARES

मुंबई गतवर्षी कोरोना या जीवघेण्या व्हायरसनं प्रवेश केला. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. शिवाय, काहींना आपल्या घरापासून लांब राहावं लागलं आहे. या कोरोनाच्या काळात महापालिकेनं मुंबईकरांसाठी अनेक सविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय, मृतांची देखील योग्यप्रकारे विलेव्हाट लावली. दरम्यान, महापालिकेनं कोरोना मृतदेह हाताळण्यासाठी आतापर्यंत १० कोटी ९९ लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत आतापर्यंत ११ हजार २२४९ मृतदेह हाताळले गेले आहेत. मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रोत्साहन म्हणून महापालिकेनं प्रत्येकी ५०० रुपये भत्ता सुरू केला आहे. मार्च ते ऑगस्ट या काळात मृत्यूचं प्रमाण अधिक होतं. त्यामुळं कोरोना मृतदेह बंदिस्त करण्याचं जोखमीचं काम करताना महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीती होती.

जीव धोक्‍यात घालून हे काम केलं जात होते, यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतेही सुरक्षा कवचही पुरवण्यात आलेलं नव्हतं. त्यानंतर महापालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांना विमा कवच पुरवलं. याशिवाय मृतदेह बंदिस्त करणारे पालिकेचे नियमित कर्मचारी, कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना मृतदेह बंदिस्त करण्यासाठी ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यात आला. या कामात दोन व्यक्तींचा सहभाग होता. त्यांना एका मृतदेहामागे एक हजार रुपये दिले जातात.

मागील ९ महिने कोरोनानं दगावलेल्यांवर महापालिकेच्या वतीनं अंत्यसंस्कार केलं जात आहेत. रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह व्यवस्थित करणं, त्याला आवरणात गुंडाळणं, मृतदेहावर माहितीचा बिल्ला बांधणं, मृतदेह शवागारात पोहोचवणं आदी कामं कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. महापालिकेनं याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता सुरू केला.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा