'या' मास्कच्या संपर्कात येताच निष्क्रीय होणार कोरोना, पुण्यातील कंपनीचा दावा

(Representational Image)
(Representational Image)

कोरोनापासून बचावाचं सर्वसामान्यांच्या हातात असलेलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मास्क (Mask). मास्क हा आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. सर्जिकल, एन-95, कापडी मास्कचा वापर केला जातो.

पण आता पुण्यातील एका कंपनीनं असा मास्क (Pune based company make mask) तयार केला आहे, जो कोरोनाव्हायरसवर भारी पडणार आहे.

पुण्याच्या थिंक्र टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपनं असा दावा केला आहे की,  या मास्कच्या संपर्कात येताच कोरोना विषाणू निष्क्रीय होणार आहे. या मास्क विषयी विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभाग (DST) कडून सोमवारी माहिती दिली गेली आहे.

कोरोना पासून बचाव होण्यासाठी मास्क लावणं फार महत्त्वाचं आहे. कोरोना पासून संरक्षण मिळावं म्हणून अनेक सेअर असलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. या मास्कवर विषाणू रोधी एजंटचा लेप दिला गेला आहे. चाचणीत या मास्कवरील लेप सार्स कोव २ ला निष्क्रीय बनवीत असल्याचं दिसून आलं आहे. हा लेप मानवी वापरासाठी सुरक्षित आहे कारण यात वापरली गेलेली सामग्री साबणात वापरली जाते.

या लेपमध्ये साबण आणि कॉस्मेटिक्स मध्ये वापरले जाणारे सोडियम ओलेफिन सल्फोनेट वर आधारित रसायन वापरले गेले आहे. या लेपच्या संपर्कात येताच कोरोना विषाणूचे बाहेरचे कवच नष्ट होते. सामान्य तापमानात याचा वापर सहज करता येतो.

स्टार्टअपचे सहसंस्थापक शीतलकुमार झांबड म्हणाले की, कोरोना काळात मास्क वापराचे महत्व खूप आहे पण सर्वसामान्य नागरिक घरगुती मास्कचा वापर अधिक प्रमाणात करत होते. हे मास्क गुणवत्तेत कमी ठरत होते. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचे मास्क ही गरज बनली होती. त्यातून या मास्कची कल्पना सुचली.

एका स्वयंसेवी संस्थेद्वारे जवळपास ६००० मास्क नंदुरबार, नाशिक आणि बंगळुरु इथल्या ४ सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना वितरीत केले गेले आहेत. सोबतच बंगळुरुमधील मुलींच्या शाळा आणि महाविद्यालयात देखील मास्क वितरीत केले गेले आहेत.

मास्क ९५ टक्क्यापेक्षा अधिक प्रभावशाली आहे. स्टार्ट-अपनं अँटी-व्हायरल मास्कचं उत्पादन सुरू केलं आहे. त्याशिवाय थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं या उत्पादनासाठी पेटंटसाठी अर्ज केला आहे.


हेही वाचा

मुंबईत एका दिवसात सर्वाधिक लसीकरणाची नोंद, 'इतक्या' नागरिकांना दिली लस

कारमध्ये एकटं असल्यास मास्क घालणं बंधनकारक आहे का?

पुढील बातमी
इतर बातम्या