Advertisement

मुंबईत एका दिवसात सर्वाधिक लसीकरणाची नोंद, 'इतक्या' नागरिकांना दिली लस

यापूर्वी ८ जून रोजी सर्वाधिक ९६ हजार ८६० लोकांना लस देण्यात आली होती.

मुंबईत एका दिवसात सर्वाधिक लसीकरणाची नोंद, 'इतक्या' नागरिकांना दिली लस
(Representational Image)
SHARES

सोमवार, १४ जून रोजी मुंबईत ९३ हजार ९९७ लोकांना लस देण्यात आली. यासह, एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं लोकांना लसीकरण (Vaccination) करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ८ जून रोजी सर्वाधिक ९६ हजार ८६० लोकांना लस देण्यात आली होती.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सध्या प्रत्येक केंद्रात लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांकरिता पालिकेनं निर्णय घेतला आहे की, दोन-लसीच्या डोससाठी एका दिवसात १ लाखाहून अधिक लोकांना लस द्यावी लागेल.

१६ जानेवारीपासून आतापर्यंत ४१ लाख इंजेक्शन्स दिली गेली आहेत. त्यापैकी ३२.८ लाखांना प्रथम डोस मिळाला आहे तर ८.२ लाख नागरिकांना दोन लसी दिल्या आहेत.

शनिवारी, १२ जून रोजी, पालिकेनं ११ हजार ०२३ नागरिकांचं लसीकरण केलं. तर, सोमवारी, १४ जून रोजी, पालिकेच्या लसीकरण केंद्रांनी १८-४४ वयाच्या ३५८ लोकांसोबतच १८ हजार ५२६ लोकांना दुसरी लस दिली.

दरम्यान, रविवारी, १३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ८८ हजार १४४ लोकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात साधारणत: आठवड्याच्या दिवशी सुमारे ३ लाख लोकांना लसी देण्याचं काम केलं जातं आहे.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, २१ जूनपासून एका दिवसात पाच लाखाहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. जर केंद्र सरकारकडून पुरेसे लस डोस मिळाला तर एका दिवसात ९ लाख लोकांना लसी देणं देखील शक्य आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलं आहे की, पुढील आठवड्यात शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. कारण महाराष्ट्राला अधिक लस मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हे समजतं की २१ जूनपासून १८ वर्षावरील प्रत्येकासाठी लस विनामूल्य दिली जाईल.

आत्तापर्यंत, मुंबईत २५९ लसीकरण केंद्रं आहेत. त्यानुसार प्रत्येकाला दिवसाला ३१ हजार लस देण्याची क्षमता आहे. पण प्रशासकिय संस्था हा आकडा वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जवळपास ५०० लसीकरण केंद्र सुरू केली जातील. याद्वारे येत्या काळात दरदिवशी किमान ५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, “जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्ही सतत लॉजिस्टिक्सवर काम करत आहोत. आमच्याकडे लसीकरण केंद्रांची संख्या ५०० हून अधिक वाढवण्याची पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. २१ जूनपूर्वी ही व्यवस्था पूर्ण होईल, अशी आमची आशा आहे. ”हेही वाचा

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १६ जूनला विशेष लसीकरण सत्र

व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय? मग सावधान...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा