Advertisement

लसीकरण केंद्रांमध्ये लवकरच होणार वाढ

केंद्र सरकारच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हे समजतं की २१ जूनपासून १८ वर्षावरील प्रत्येकासाठी लस विनामूल्य दिली जाईल. त्यामुळे लसीकरण केंद्रांमध्ये वाढ केली जात आहेत.

लसीकरण केंद्रांमध्ये लवकरच होणार वाढ
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलं आहे की, पुढील आठवड्यात शहरातील लसीकरण केंद्रांची (Vaccination Center) संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. कारण महाराष्ट्राला अधिक लस मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हे समजतं की २१ जूनपासून १८ वर्षावरील प्रत्येकासाठी लस विनामूल्य दिली जाईल.

आत्तापर्यंत, मुंबईत २५९ लसीकरण केंद्रं आहेत. त्यानुसार प्रत्येकाला दर दिविशी ३१ हजार लस देण्याची क्षमता आहे. पण प्रशासकिय संस्था हा आकडा वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जवळपास ५०० लसीकरण केंद्र सुरू केली जातील. याद्वारे येत्या काळात दरदिवशी किमान ५५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, “जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्ही सतत लॉजिस्टिक्सवर काम करत आहोत. आमच्याकडे लसीकरण केंद्रांची संख्या ५०० हून अधिक वाढवण्याची पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. २१ जूनपूर्वी ही व्यवस्था पूर्ण होईल, अशी आमची आशा आहे. ”

महानगरपालिकेनं असं म्हटलं आहे की, त्यांच्याकडे सुमारे १ लाख लस डोस शिल्लक आहेत जे त्यांच्या दुसर्‍या लसीच्या शॉटची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी राखीव आहेत.

केंद्र सरकारच्या (Central Government) नव्यानं जाहीर करण्यात आलेल्या धोरणानुसार, ७५ टक्के लस केंद्राकडून अधिग्रहित केली जाईल. तर उर्वरित २५ टक्के खासगी रुग्णालयांसाठी उपलब्ध असतील. केंद्रानं लस पुरवठा करण्याची जबाबदारी घेतल्यानंतरही सार्वजनिक आरोग्य विभागानं सांगितलं की, ते उत्पादकांशी संपर्क साधतील.

“यापूर्वी अनेकदा कुपी उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं आहे. आम्हाला अनेक केंद्रांवर लसीकरण कार्यक्रम थांबवावा लागला. केंद्रानं कुपी पुरवण्याचे आश्वासन दिलं असलं तरी आम्हाला उत्पादकांशी संवाद थांबवायचा नाही. आमच्याकडे बॅकअप असणं आवश्यक आहे. आम्हाला पर्याप्त प्रमाणात कुपी मिळत नाहीत, "असं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

केंद्रानं अलीकडेच जाहीर केलं की, सेवा शुल्क म्हणून खासगी रुग्णालये प्रति लस डोस १५० पेक्षा अधिक आकारू शकत नाहीत. तथापि, खासगी रूग्णालयांचा असा विश्वास आहे की, सेवा शुल्क कमी केल्यानं रूग्णालयाच्या बाहेरच्या लसींवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, गृहनिर्माण संस्था किंवा कॉर्पोरेट लसीकरण ठिकाणी ज्यात रुग्णवाहिका आवश्यक असतील.

बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजीशियन डॉ. गौतम भन्साळी, “सोसायट्या आणि कॉर्पोरेट क्षेत्रात लसीची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला रुग्णवाहिका उभ्या ठेवण्याची गरज आहे आणि ही व्यवस्था महाग आहे. सेवा शुल्क म्हणून याची किंमत १५० पेक्षा जास्त आहे. आम्ही सरकारच्या निर्णयाचा पूर्णतः सन्मान करत असलो तरी, किंमतीच्या तुलनेत रुग्णालयाबाहेर लसीकरण शिबिरं आयोजित करणं अडचणीचं ठरेल.



हेही वाचा

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १६ जूनला विशेष लसीकरण सत्र

व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय? मग सावधान...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा