...यामुळे केईएममधील एक्स-रे मशीन पडली बंद

  • भाग्यश्री भुवड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

मुंबईत मंगळवारी कोसळलेल्या पावसामुळे सर्वांचेच मोठं नुकसान झाले. काही लोकांच्या घरात पाणी शिरले, तर काहींचे सामान त्या पाण्यात बुडाले. या पाण्यामुळे परळच्या केईएम रुग्णालयाचेही नुकसान झाले आहे. 

केईएम रुग्णालयातील एमर्जन्सी विभागातील दोन मशीनपैकी एक मशीन पावसाच्या पाण्यामुळे खराब झाली आहे. त्यामुळे सर्व भार एकाच मशीनवर येत असल्याचे एक्स-रे विभागाचे प्रमुख डॉ. देशमुख यांनी सांगितले.

एमर्जन्सी विभागात एकूण 3 मशीन आहेत. त्यापैकी दोन मशीन कार्यरत होत्या. पण सध्या एक मशीन सुरू आहे. येत्या 15 दिवसांत ती सुरू करण्यात येईल असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. पण, दोन मशीनपैकी 5 नंबरची एक मशीन पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे बंद पडली आहे. त्यामुळे फक्त एमर्जन्सी रुग्णांचेच एक्स-रे काढले जात आहेत.

ज्या रुग्णांचे पूर्ण बॉडी चेक अप करायचे आहे, किंवा ज्यांचे गुडघे तपासायचे आहेत, अशा रुग्णांचे एक्स-रे काढले जात नाहीत. कारण त्या एमर्जन्सी विभागात प्रमाणापेक्षा रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे फक्त छोटे- छोटे एक्स-रेच सध्या केले जात आहेत. त्यामुळे रुग्णांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

आता सध्या फक्त एकच एक्स-रे मशीन कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व भार एकाच मशीनवर पडतोय. मशीन दुरुस्त करायला आणखी काही दिवस लागतील. म्हणून अगदी एमर्जन्सी रुग्णांचेच एक्स-रे इथे काढले जात आहे. काही उपकरणे हलवण्यात आली होती. पण, तरीही एक मशीन बिघडली आहे.

- डॉ. देशमुख, प्रमुख, एमर्जन्सी एक्स-रे विभाग

केईएम रुग्णालयात जवळपास दिवसाला 3 ते 4 हजार रुग्ण दाखल होतात. त्यातही एका वेळच्या एमर्जन्सी क्ष-किरण विभागात जवळपास 50 ते 60 रुग्ण येतात. त्यामुळे एका दिवशी एवढ्या रुग्णांचे एक्स-रे काढणे कधी कधी कठीण होते, अशी ही प्रतिक्रिया डॉ. देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.

मंगळवारच्या अतिवृष्टीमुळे महापालिका रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागात एकूण 9 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अतिवृष्टीमुळे एकूण 4 जणांचा बळी गेल्याचे महापालिका प्रमुख रुग्णालय आणि वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.


हेही वाचा - 

केईएम, शीव, नायरमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर

केईएम रुग्णालयात पंजाब नॅशनल बँक आणि टपाल खात्याची सेवा


पुढील बातमी
इतर बातम्या