केईएममध्ये रुग्णालयाची माहिती देणारं मशीन

 Parel
केईएममध्ये रुग्णालयाची माहिती देणारं मशीन
केईएममध्ये रुग्णालयाची माहिती देणारं मशीन
केईएममध्ये रुग्णालयाची माहिती देणारं मशीन
केईएममध्ये रुग्णालयाची माहिती देणारं मशीन
See all
Parel, Mumbai  -  

रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यात समन्वय साधण्यासाठी रुग्णालयाची माहिती दर्शवणारी मशीन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्ली यांच्या वतीने केईएम रुग्णालयाला शुक्रवारी देण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा आमदार अजय चौधरी, माजी खासदार दगडू सकपाळ, केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते करण्यात आला. 

रुग्णालय, डॉक्टर, रुग्ण माहिती पट, विभाग, वॉर्ड, ओपीडी, सेवा, महत्वाची माहिती, मान्यवरांचे मत, अशी रुग्णालयाची संपूर्ण माहिती दर्शवणारी केऑस मशीन डॉ. विकास वऱ्हाडकर यांनी तयार केली आहे.

यात कोणत्या डॉक्टरांची ओपीडी केव्हा आणि कोणकोणत्या वारी असेल हे कळेल. तसेच मुंबईतील रुग्णांना मदत करणाऱ्या ट्रस्ट, नर्सिंग ब्युरो कुठे आहेत हे देखील कळेल. ही मशीन हाताळण्यास सोपी असल्याने अशिक्षित व्यक्तीही याचा सहज वापर करू शकतो. तर या मशीनवर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत माहिती उपलब्ध आहे. सध्या केईएम रुग्णालयाच्या गेट क्रमांक 2 येथे एक मशीन आणि नवीन इमारतीच्या गेटवर एक मशीन अशा दोन मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचारी यांचा प्रतिसाद पाहून मशीनची संख्या येत्या काळात वाढविण्यात येईल असे मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी सांगितले.

Loading Comments